आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमण संस्कृती:जीवनात प्रार्थनेबरोबरच प्रयत्नही आवश्यक : आचार्य पुलकसागर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनातून वासनेचा विकार निघून जाणे म्हणजे निर्वाण आहे. मोहापासून दूर राहणे म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष ही वडिलोपार्जित संपत्ती नसून आपल्या कर्माने व श्रमाने मिळवावी लागते. महावीरांच्या संस्कृतीला श्रमण संस्कृती म्हणून ओळखले जाते. श्रमण संस्कृतीचा अर्थ असा आहे की, मिळवाल ते श्रमाने मिळेल. तुम्ही जेथे पोहोचाल तेथे तुम्ही श्रमाने पोहोचाल, मोक्ष प्रयास केल्याने मिळत असते. भगवान महावीर हे प्रार्थनेने नाही तर प्रयत्नाने मिळतील, असा उपदेश पुलकसागर महाराज यांनी दिला. वेदांतनगर येथील चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरातर्फे आर्यनंदी कॉलनी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सूत्रसंचालन अरुण पाटणी यांनी केले, तर मंगलाचरण ज्योती चांदीवाल यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...