आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी जानेवारीत कोची येथील कुमारने फूड डिलिव्हरी कंपनीत काम करण्याच्या इराद्याने नवीन मोटारसायकल खरेदी केली. त्याला ९ ते ५ ची नोकरी नको होती आणि स्वतःच्या वेळेनुसार काम करायचे होते. या ११ महिन्यांत त्याने ४५ दिवसांची रजा घेतली असली तरी त्याच्या वाहनाचे मीटर ३६,५०१ किमीपर्यंत पोहोचले होते. म्हणजे त्याने रोज किमान १०० ते १५० किमी गाडी चालवली आणि दिवसाचे १२ तास अथक परिश्रम केले, बऱ्याच वेळा त्याने दुपारचे जेवणही केले नाही, कारण त्याला ईएमआय भरण्यासह घरखर्च चालवावा लागला. आता पेट्रोल महाग झाले आहे, इन्सेंटिव्ह कमी होत आहेत, स्पर्धा वाढत आहे आणि कंपन्या डिलिव्हरी शुल्क (प्रति डिलिव्हरी २० रुपये) न वाढवता त्यांचे कव्हरेज वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, कुमारसारख्या लोकांसाठी नोकऱ्या कठीण होत आहेत. कुमारने नुकतीच नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारली आहे. मी त्याला नोकरी बदलण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने लग्न करायचे असल्याचे सांगितले आणि जीवनसाथी मिळणे कठीण आहे, कारण त्याच्या कुटुंबाला असे वाटत होते की, त्याची नोकरी तात्पुरती आहे, शिवाय स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी कामाचे तासही अधिक आहेत.
कुमार एकटा नाही, त्याच्यासारखे केरळमधील दोन लाख लोक आहेत. कधी ते चेहरा नसलेल्या नियोक्त्याकडून पगार आणि इन्सेंटिव्ह मिळवण्यासाठी संपावर जातात, तर कधी शांतपणे कुमारसारखे व्यवसाय बदलतात. अन्न वितरण कंपन्यांना यामुळे काही फरक पडत नाही, कारण कामासाठी नेहमीच नवीन लोक असतात. खाण्यापासून ते टॅक्सीपर्यंत - देशात ७७ लाख लोक विविध प्लॅटफॉर्म आधारित सेवांमध्ये काम करत आहेत. एका अभ्यासानुसार, २०२९-३० पर्यंत ही संख्या २.३५ कोटी होईल, असा अंदाज आहे. परंतु, या प्रचंड श्रमशक्तीचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोणताही कायदा नाही.
गेल्या आठवड्यात एका कौटुंबिक लग्नात कोणी तरी वर कुठे काम करतो, असे विचारले तेव्हा मला या मोठ्या कामगारवर्गाची आठवण झाली. मी म्हटले की, तो न्यूयॉर्कमध्ये आयटी इंजिनिअर आहे. तर ते म्हणाले, तुम्हाला युरोपमधून कोणी मिळाले नाही का? माझ्या भुवया उंचावल्या तेव्हा ते म्हणाले, ‘बघा, २८ ऑक्टोबरला एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून, अशा मोठ्या कंपनीत ७,५०० कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आणि अमेरिकेने वरांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून आपली चमक गमावली आहे.’ तेव्हाच मला जाणवले की, अमेरिकेत नोकरीचे लेबल असलेले तरुण आणि पात्र पदवीधर आता लग्नाच्या बाजारपेठेत आघाडीवर नाहीत. यामुळे मला काही अभिमानी पालकांशी त्यांच्या अमेरिकेत काम करणाऱ्या मुलांसाठी योग्य जीवनसाथी शोधण्याच्या अनुभवांबद्दल बोलण्यास प्रवृत्त केले. आणि त्यांनी मान्य केले की, आजकाल मुलींच्या कुटुंबांना सर्वात जास्त स्थैर्य हवे असते नोकरीपासून कंपनी, मालक, देश आणि शेवटी अर्थव्यवस्थेतही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.