आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादेत स्वाभिमान सभा झाली. या सभेची जय्यत तयारी शिवसेनेने केली होती. सभेपूर्वी मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली. हेवा वाटावा असा लखलखाटही यावेळी पाहायला मिळाला. त्याचीच एक झलक खास तुमच्यासाठी.
मराठवाडा सांस्कतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हात उंचावताना. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, औरंगाबादचे पालकमंत्री सूभाष देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मंत्री अब्दुल सत्तार आदी.
शिवसेनेच्या स्वाभिमान सभेत मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांना औरंगाबादची प्रसिद्ध हिमरु शाल भेट देत सत्कार करताना मंत्री शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते.
शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार करुन त्यांना गदा भेट देताना.
सभास्थळी छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरेंसह आदी.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावल झालेली अलोट गर्दी.
जलआक्रोश मोर्चा काढणाऱ्या भाजपने आजही विमानतळावर मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या महिला.
मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी ताब्यात घेतलेले भाजपचे पदाधिकारी, नेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.