आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठा महोत्सव:जन्म देणाऱ्यांचे सदैव ऋणी राहा : आ. हेमसागर महाराज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य हेमसागर महाराज यांच्या उपस्थितीत सज्जनपूर, कसाबखेडा येथे तीनदिवसीय वेदी प्रतिष्ठा महोत्सव झाला. महोत्सवाची सांगता शोभायात्रेने झाली. या वेळी आचार्य हेमसागर महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली. तद्नंतर शोभायात्रेचे मंदिरात आगमन झाले. भगवंतांचा १०८ कळशांनी अभिषेक केला. तद्नंतर महापूजन झाले.

तसेच जनकल्याणसाठी महाहवन व जलहोम झाले. आचार्य हेमसागर महाराज यांनी प्रवचनात सांगितले की, जन्म देणाऱ्या आई व वडिलांचे सदैव ऋणी राहा. भाविकांना राजकुमार, भरत, महेंद्र, सुमीत ठोले व माणिकचंद, संतोष, निर्मल ठोले परिवारातर्फे महाप्रसाद देण्यात आला. शांतिधारेचा मान चंद्रकलाबाई फुलचंद दगडा यांना मिळाला. मूलनायक पार्श्वनाथ भगवंताचा प्रथम अभिषेक करण्याचा मान लक्ष्य, मयंक, पहाडिया व तनसुखलाल, मदनलाल ठोले परिवार यांना मिळाला.

आचार्य हेमसागर महाराज यांच्या पादप्रक्षालनचा मान आशिष, पारस काला व राजकुमार, भरत, महेंद्र, सुमीत ठोले यांना मिळाला. यंत्र व नवरत्न स्थापन करण्याचा मान पवनकुमार, प्रकाश, प्रमोद ठोले यांना मिळाला. महोत्सव यशस्वीतेसाठी माणिकचंद ठोले, सुमीत ठोले, गौतम ठोले, विश्वस्त अनिल काला, महेंद्र ठोंले, राजकुमार पांडे, संतोष ठोले, अंकित काला आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...