आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:नुकसानग्रस्त भागात शिंदे सरकारच्या वांझोट्या भेटी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा हल्लाबोल, बांधावर जात करणार पाहणी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात अनेक भागात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सरकार नुकसानग्रस्त भागात वांझोट्या भेटी आणि घोषणा देत आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. राज्यातील अनेक भागात गारपीटीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने कोणताही दिलासा दिलेला नाही. सरकारने तात्काळ मदतीचा निर्णय घेतला पाहिजे.

रॅपर राम मुंगासेच्या पाठीशी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, रॅपर राम मुंगासेंला कोर्टाकडून जामीन मंजूर झाला असून, यापुढे आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. त्यांने एक रॅप गाणे तयार केल्याने सत्ताधारी लोकांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्या गाण्यात कुणावरही वैयक्तिक टीका असल्याचे दिसत नाही. मात्र, सरकारकडून इग्रजांच्या काळात देण्यात येणारी वागणूक देण्यात येत आहे. तशा कारवाया लोकांवर होत असल्याचा आरोप ही अंबादास दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, सत्ताधारी हे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहे. राम मुंगसे याने त्याच्या रॅपमध्ये कोणाच नाव घेतल नाही किंवा अपशब्दाचा प्रयोग केला नाही. अशा प्रकारे गुन्हा दाखल करण योग्य नसून सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा अपमान सुरू आहे.

गेली 9 महिने महाराष्ट्रभरात 50 खोके अशी टीका अनेकदा अनेक लोकांनी केली आहे. नवरात्र असो की शिमगा सर्व सणांच्या दिवशी या घोषणा देण्यात आल्या. तर पोळ्याच्या दिवशी लोकांनी बैलांवर 50 खोके एकदम ओेके असे लिहले होते. मग आता या सर्वांवर देखील गुन्हे दाखल करणार का असा सवाल यावेळी अंबादास दानवेंनी उपस्थित केला आहे.