आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खून, खंडणी प्रकरणातील ठाण्यातील एका आरोपीला अयोध्या दौऱ्यावर आपल्या विमानातून नेल्याचा आरोप विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत केला आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे चालते का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
नेमके ट्विट काय?
विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे. अंबादास दानवे म्हणाले की, काय हा 'फडतूस'पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटते. ते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून. देवेंद्र फडणवीस आपल्याला आता हे तुम्हाला चालते का?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. यात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदेंच्या ताफ्यात असलेल्या सिद्धेश अभंगे या ठाण्यातील शिवसैनिकाला सोबत नेण्यावरुण जोरदार टीका केली आहे. गेली अनेक वर्षे सिद्धेश अभंगे याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याने मागील वर्षी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत अनेकदा दिसून येत असतात.
कोण आहे सिद्धेश अभंगे?
सिद्धेश अभंगे हा ठाण्यातील एक युवासेनेचा कार्यकारिणी सदस्य आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून गेल्या वर्षी त्यांने युवासेनेत प्रवेश केला होता, यावेळी वरुण सरदेसाई यांच्याही उपस्थिती होती. मात्र तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासोबत त्याचे अनेक वेळा फोटो पाहायला मिळाले. यातच त्यांची सोशल मिडियावर भाई म्हणून ठाण्याच्या तरुणामध्ये क्रेझ वाढल्याचे दिसून येत आहे. यू ट्यूब भाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या गँगस्टर सिद्धेश अभंगे याची स्थानबद्धतेतून सुटका झाल्यानंतर त्याला नेण्यासाठी त्याच्या समर्थकांनी लवाजमाच आणला होता.
अनेक गुन्हे दाखल
खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, अमली पदार्थांची तस्करी आदी गुन्ह्यांमध्ये सिद्धेशविरुद्ध ठाण्यातील कोपरी, चितळसर, वर्तकनगर आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.ठाणे रेल्वे पार्किंगचे ठेके त्याच्याकडे आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.