आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅपर राजेश मुंगसेच्या पाठीशी उभे राहणार:विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला विश्वास

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिसगाव येथील राजेश मुंगसे याने ‘पन्नास खोके’ हे रॅप साँग तयार केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. राजेशला कोर्टाकडून जामीन मंजूर झाला असून यापुढे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्याच्या पाठीशी उभी राहणार अाहे, अशी ग्वाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.

‘पन्नास खोके’ हे रॅप साँग तयार केल्याने राजेशविरोधात कलम ५०४, ५०२ (२), ६७ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याआधीच दानवे यांनी त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. नंतर राज्यकर्ते हुकूमशाही करत आहेत, असा आरोप दानवे यांनी केला.दरम्यान, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उप जिल्हा प्रमुख बप्पा दळवी यांनी बुधवारी दुपारी मुंगसे कुटुंबीयांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. या वेळी राजेशच्या भावाने ‘राजेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली,’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली.

त्यांचे मुख्यमंत्री असताना काय केले? घटनात्मक पदावरील व्यक्तीबाबत आक्षेपार्ह बोलले जाते तेव्हा लोकशाही टिकवण्यासाठी कारवाई आवश्यक आहे. त्यामुळेच मुंगसेवर कारवाई झाली. टीका करणाऱ्यांनी त्यांचे मुख्यमंत्री असताना काय केले याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. – राजेंद्र जंजाळ, जिल्हाध्यक्ष, शिवसेना