आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या पत्राने पुन्हा सिद्ध केले बोलविता धनी कोण:जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण; हा महाराष्ट्राचा अपमान - दानवे

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात वाद सुरू आहे. या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहले आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

राज्यपालांनी जनतेची माफी मागण्याऐवजी केंद्र सरकारला पत्र लिहित भूमिका मांडली आहे, जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणे हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवेंचे ट्विट काय?

राज्यपाल महोदयांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून भूमिका विषद केली म्हणे. आपल्या वाचाळपणाचे स्पष्टीकरण दिल्ली दरबारी देऊन आपले बोलवते धनी कोण, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणे हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार आहे.

राज्यपालक काय म्हणाले?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपालांनी माफी मागावी आणि त्यांनी राज्यपाल पदावरुन पायउतार व्हावे अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. राज्यात होणाऱ्या या विरोधानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. यात राज्यपाल म्हणताय की, महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करु शकत नाही. माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले असे पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...