आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नड्डांच्या सभेचा परिणाम होणार नाही:अंबादास दानवेंचा भाजपला टोला; लोकसभेसाठी कितीही तयारी केली तरी त्यांच्याकडे उमेदवार नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्यावतीने लोकसभेच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष औरंगाबादमध्ये सभा देखील घेणार आहेत. भाजपच्या वतीने उमेदवार देण्यात येत आहेत. मात्र, भाजपने कितीही दंड बैठक करू द्या त्यांच्याकडे उमेदवारच नाही, त्यामुळेच कुठलाही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडलेल्या प्रश्नांबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी अब्दुल सत्तार यांच्यापासून ते विदर्भ आणि मराठवाड्यातल्या प्रश्नांवर मांडलेल्या भूमिकेबाबतची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

जमिनीचे रुपांतर आधीपासून

अंबादास दानवे म्हणाले की, उद्योगांच्या जमिनीचे कमर्शियल तसेच निवासी वापर हा विलासराव देशमुख तसेच राजेंद्र दर्डा आणि नारायण राणे हे उद्योग मंत्री होते तेव्हापासून सुरू आहे. त्यामुळे यामध्ये कुठलाही गैरप्रकार झालेला नसून ती नियमित प्रक्रिया असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. शहरातल्या ज्या भागात उद्योग सुरू झाले नव्हते त्या जमिनी कमर्शियल आणि निवासी करण्यात आल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले,राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, सुनीता आऊलवार यांची उपस्थिती होती.

'अब्दुल सत्तार'च बाहेर बोलतात

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्याच्या बैठकीतल्या विषय बाहेर चर्चेला जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे शिंदे गटात वाद असल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की अब्दुल सत्तारच अशा प्रकारच्या चर्चा बाहेर करत असतात त्यांनाच ती सवय असल्याचा दावा दानवेंनी केला आहे. तर संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धात शिरसाठ यांच्या प्रकरणात बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला अशी प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली आहे

बातम्या आणखी आहेत...