आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा दावा:मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी ठरवले असते, तर 40 आमदारांना रोखले असते

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी ठरवले असते, तर 40 आमदारांना रोखले असते, असा दावा बुधवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळात त्यांना अटक करण्याचा संदर्भात हालचाली सुरू असल्याचा आरोप केला होता. या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीसांचा दावा खोटा

अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना ठरवले असते, तर जे 40 आमदार निघून गेले होते, त्यांना देखील ते रोखू शकले असते. मुख्यमंत्र्याकडे खूप मोठी पावर आहे. त्यांच्याकडे मोठी शक्ती असते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे फडणवीस यांच्या दाव्यात कुठलेही तथ्य नसल्याचे दानवे म्हणाले.

आचारसंहितेचा भंग

राज्यात शिक्षक निवडणूक सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या संदर्भात आश्वासन दिले होते. याबाबत दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक सुरू असताना अशा प्रकारे आश्वासन देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

बैठक घेवून निर्णय होणार

राज्यात कसबा आणि चिंचवडच्या रिक्त जागेवर विधानसबा निवडणूक होणार आहे. याबाबत महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी निवडणूक लढवणार की नाही, याचा निर्णय संयुक्तरित्या बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...