आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवेंची सत्तारांवर टीका:किती खोटं बोलणार? निधी, भेट अन् वेळ मिळाल्याचं तुम्हीच जगाला सांगितलं!

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदित्य ठाकरे कधीही माझ्या मतदारसंघात आले नाही असे वक्तव्य आमदार अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आता आमदार अंबादास दानवेंनी खरपूस समाचार घेतला आहे. यापुढे आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात आले नाहीत असे छाती ठोकून बोलू नका. तुमची स्मरणशक्ती क्षीण झाली असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या, असा टोला त्यांनी लगावला आहे. सत्तार यांच्या जुन्या ट्विटचे स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकांना पुन्हा सामोरे जावे, असे आव्हान केले होते. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनीही तिखट शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंना चांगलेच सुनावले होते. मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार आहे, फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा, अशा शब्दांमध्ये सत्तारांनी त्यांना उत्तर दिले होते. मात्र आता अंबादास दानवे यांनी सत्तारांना खडे बोल सुनावले आहेत.

नेमके काय म्हणाले होते सत्तार?

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले होते, माझी मातोश्रीवर जायची अजिबात इच्छा नाही. मात्र आदित्य ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघात यावे. या आधी कधीही आपण आला नव्हतात, पण आता या. मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायलाही तयार आहे, फक्त एकनाथ शिंदे यांनी परवानगी द्यावी. मी किती मतांनी निवडून येतो, हेही आदित्य ठाकरेंनी पाहावे.

दानवेंचे पुराव्यासहित ट्विट

आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात आले नाहीत या अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करत त्यांना खडे बोल तर सुनावलेच आहेत शिवाय त्यांच्या वक्तव्याची पोलखोल करणारे पुरावेही त्यांनी जगजाहीर केले आहेत.

ते म्हणाले, 'किती खोटं बोलणार, अब्दुल सत्तारजी! आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात आले नाहीत असे यापुढे छाती ठोकून बोलू नका. निधी.. भेट आणि वेळ आपल्याला मिळाल्याचा पुरावा तुम्हीच जगाला सांगितला आहे. स्मरणशक्ती क्षीण झाली असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या!' असे त्यांनी म्हटले आहे.

दानवेंनी दिले प्रत्युत्तर

अंबादास दानवेंनी या ट्विटसोबत काही बातम्यांचे कात्रण, सत्तार यांनी केलेल्या ट्विटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रिनशॉटमध्ये अब्दुल सत्तार आदित्य ठाकरेंचे सिल्लोडमध्ये स्वागत करत असल्याचा मजकूर आहे. यावरुन सत्तार धादांत खोटे वक्तव्य करत असल्याचे दानवेंचे म्हणणे आहे.

अंबादास दानवेंनी ट्विटसोबत का सत्तार यांनी केलेल्या ट्विटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.
अंबादास दानवेंनी ट्विटसोबत का सत्तार यांनी केलेल्या ट्विटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...