आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिर्यारोहण:वादळामुळे अंबादासची मोहीम हुकली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३६० एक्सप्लोरर व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी आयोजित केलेल्या “माउंट आकांकगुआ’ या आंतरराष्ट्रीय मोहिमेत अंबादासने साहसीपणा दाखवत ६३०० मीटरवर चढाई केली. गारठवणारे उणे -२० ते -२५ तापमान, खराब वातावरण व वेगवान वाऱ्यामुळे अवघी ६६२ मीटर उंची बाकी असल्याने मोहीम फत्ते होऊ शकली नाही.गिर्यारोहणातील आजकालचे मॅच्युअर उदाहरण म्हणून यांच्याकडे पाहता येईल. दक्षिण अमेरिकेतील माउंट आकांकगुआ शिखरावर सतत येणारे वादळ ८५-९० ताशी वेगाने वाहणारे वारे ही येथील चढाईत सर्वात मोठी अडचण ठरत होती. पुढील चढाईत सर्व काही चांगले सुरू असताना कॅम्प-२ च्या जवळ अचानक वातावरण खराब झाले. त्यामुळे अनेक टीम माघारी निघाल्या होत्या.

सर्व टीम खाली येत असताना अंबादास गायकवाड व इतर टीम मेंबरनी चढाई सुरू ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. ४ दिवस भयंकर वादळात कॅम्प-१ वर दोन दिवस तंबूत बसून काढले. अशा परिस्थितीत सर्वांनी संयमाने निर्णय घेतला. एक चुकीचा निर्णय सर्व सदस्यांच्या जिवावर बेतणारा होता. वादळाची पर्वा न करता अंबादास गायकवाड यांनी चढाई पुढे सुरू ठेवली व कॅम्प-३ ला मुक्काम करून समिट पुश सुरू केला. परंतु उणे तापमान, वेगाने वाहणारे वारे व खराब हवामान यामुळे गाइडने हा समिट पुश थांबवून मागे येण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...