आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस याचे सूतोवाच:अंबाजोगाईलाच मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे ; डॉ. नरेंद्र काळे यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेच्या विद्यापीठासाठी अंबाजोगाई हेच ठिकाण योग्य आहे, परंतु शासनाने मराठी भाषेचे विद्यापीठ अमरावतीच्या रिद्धपूर येथे करण्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात याचे सूतोवाच केले आहे. पण आद्यकवी मुकुंदराज यांनी अंबाजोगाई येथेच पहिली कविता केली. त्यामुळे अंबाजोगाईलाच मराठी भाषेचे विद्यापीठ करावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तथा राष्ट्रवादीच्या पदवीधर आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात म्हटले की, ‘मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अमेरिका येथील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे व्हावे, असा ठराव मंजूर केला होता. त्याशिवाय सर्वच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असाच ठराव मंजूर करण्यात आला. मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने जी समिती स्थापन केली होती त्या समितीचा अहवाल प्रथम सभागृहात ठेवावा. समितीने अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावे, अशी शिफारस केली आहे.

बातम्या आणखी आहेत...