आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑरा ऑफ ऑरिक:आठ देशांच्या राजदूतांचे शहरात आगमन; विदेशी गुंतवणूक, पर्यटनावर आज चर्चा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्याेगमंत्री देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

औरंगाबाद व परिसरातील औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पर्यटन राजधानी औरंगाबादच्या परिसरातील औद्योगिक व पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ‘ऑरा ऑफ ऑरिक’ या विदेशी गुंतवणूक व पर्यटन संधीबाबत २६ मार्च रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आठ देशांतील राजदूत या परिषदेसाठी आले आहेत. रविवारी ते ऑरिक सिटीला भेट देऊन पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतच शहरातील उद्याेजकांशी चर्चा करणार आहेत.

चिआँग मिंग फुंग (राजदूत सिंगापूर), झाक्यअस लिम (उपराजदूत सिंगापूर), ऐना लेकवाल (राजदूत स्वीडन), मरजा सिरक्का इनिंग (राजदूत जर्मनी), योंग ओग किम (राजदूत कोरिया), कोबी शोशानी (राजदूत इस्रायल), अल्बर्ट्स विल्हेल्मस डी जोंग (राजदूर नेदरलँड), अलेक्सी सुरोवत्सेव (राजदूत रशिया), गोओर्गी द्रेअर (उपराजदूत रशिया) हे राजदूत शुक्रवारी शहरात आले. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक) अंतर्गत शेंद्रा व बिडकीन परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याला जागतिक पातळीवर प्रमोट करणे तसेच औरंगाबाद परिसरातील पर्यटन संधींचा आढावा या परिषदेतून घेणे अपेक्षित आहे.

शनिवारी सकाळी शेंद्रा ऑरिकमध्ये ही परिषद होईल. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे प्रमुख पाहुणे असतील. उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, एआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. रंगानायक, एनआयसीडीसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एआयटीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक जितेंद्र काकुस्ते, रशियन विकास परिषदेचे सदस्य अलेक्झांडर प्रेमिनोव, यूएसआयएसपीएफच्या संचालक सुरभी वहाळ, तैवान चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जेनिफर मखेचा, जेट्रोचे महासंचालक मुनेनोरी मस्तुंगा, वाणिज्य आयुक्त स्विस बिझनेस हब विजय अय्यर आदी विविध देशांतील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थिती राहतील.

बातम्या आणखी आहेत...