आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना काळात रुग्णांची लूट:पावती द्या, कारवाई करू : आरटीओ, पावत्या कशा मिळणार : नातलग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅम्ब्युलन्ससाठी होत असलेल्या लुटीवरून रुग्णांचे नातेवाईक संतप्त

रुग्णवाहिका चालकांकडून कोरोना काळात रुग्णांची लूट होत असल्याप्रकरणी आरटीओंशी संपर्क साधला असता त्यांनी पावती द्या कारवाई करू, असे सांगितले. यावर हे सर्व बेकायदेशीर सुरू असून, परिस्थितीचा फायदा घेत लूट सुरू असल्याचे मत रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केले. रुग्ण नेत असतानाच्या मानसिकतेत दराच्या पावत्या कशा मिळवणार, असा संतप्त सवालही या नातेवाइकांनी केला. राज्यातील प्रमुख शहरांत आलेले अनुभव या नातलगांनी दिव्य मराठीला सांगितले.

आरटीअो म्हणतात
लेखी तक्रार आली तर कारवाई करू - अजित शिंदे, आरटीओ, पुणे
जास्तीचे भाडे आकारले असेल तर पावती घ्या, गुन्हे दाखल करू - संजय डोळे, डेप्युटी आरटीओ, नागपूर
एकही लेखी तक्रार आली नाही - अतुल आदे, डेप्युटी आरटीओ, नागपूर

दोन किमीसाठी द्यावे लागले सहा हजार रुपये
सोलापूर :
माेनार्क हाॅस्पिटल ते ज्ञानेश्वरनगरपर्यंतचे साधारण दीड ते दाेन किलाेमीटरचे अंतर. या रुग्णालयातून बाहेर पडलेल्या व्यक्तीला हाकेच्या अंतरावरील घर गाठण्यासाठी तब्बल ६००० हजार रुपये माेजावे लागले. सिंहगड काेविड सेंटर ते सिद्धेश्वर हाॅस्पिटल या सहा किलाेमीटर अंतरासाठी एका रुग्णाला घरी पोहोचवण्याचे रुग्णवाहिकेने तब्बल ६ हजार ५०० रुपये घेतले.

नाशिक : एका रुग्णास द्वारका येथून कामगार कल्याण रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी २५०० रुपये मागितले. नाशिक रोडच्या एका महिलेस पंचवटीत पोहोचवण्यासाठी ४ हजारांचे भाडे लागले. कोविड रुग्णांच्या वाहतुकीसाठी पीपीटी कीटचा अतिरिक्त खर्च येतो या नावाखाली अधिक पैसे उकळत असल्याचे एका नातेवाइकाने सांगितले.

जळगाव : शहरातून एका अत्यवस्थ रुग्णाला पुण्याला हलवण्यासाठी अॅम्ब्युलन्स चालकाने २२ हजार रुपये घेतले. कोरोना रुग्णांसाठी साध्या रुग्णवाहिका मुंबई-पुण्याला जाण्याचे ५० हजार रुपये घेत असल्याच्या तक्रारी नातलग करतात. शहरात कोठेही जाण्यासाठी १ ते ३ हजार रुपये लागतात. तालुक्याच्या गावातून जळगाव शहरात येण्यासाठी १० ते १५ हजार रुपये लागतात.

पुणे : बिबवेवाडी येथील रुग्णास सात किलाेमीटर अंतरावरील रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेने आठ हजार रुपये आकारले. रुग्णाच्या नातलगांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर आरटीआेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. तेव्हा ती व्यक्ती रुग्णवाहिकेचा बेकायदा वापर करीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...