आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराज, विज्डम विजयी:अमेय भुजबळ व अथर्व तोतला सामनावीर पुरस्काराचे मानकरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार इम्तियाज जलील प्रस्तुत डॉ. रफिक झकेरिया क्रिकेट स्पर्धेत युवराज क्रिकेट अकादमी व विज्डम क्रिकेट अकादमी संघांनी विजय मिळवले. शनिवारी नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अमेय भुजबळ व अथर्व तोतला सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. पहिल्या सामन्यात युवराज अकादमीने एनपी अकादमीवर ९ गड्यांनी मात केली. प्रथम खेळताना एनपी क्रिकेट अकादमीने २८ षटकांत सर्वबाद ८८ धावा उभारल्या. झैद खानने ६६ चेंडूंत १३ धावा केल्या. युवराजकडून कर्णधार अमेय भुजबळने २५ धावा देत ४ गडी बाद केले. शिवम व अनिकेत खरातने प्रत्येक २-२ गडी बाद केले. प्रत्युत्तरात, युवराज अकादमीने १२.५ षटकांत १ गडी गमावत विजय साकाराला. अष्टपैलू अमेय भुजबळेने ५१ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ६१ धावांची विजयी खेळी केली. मनीषने १४ चेंडूंत १ चौकारासह नाबाद ९ धावा केल्या. ओम जाधवने एकमेव बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...