आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात हरघर झेंडा अभियान राबवण्यात येत आहे.हर घर झेंडा या अभियानाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात साडेपाच लाख लोकांच्या घरी या अभियानातून झेंडा लावला जाणार आहे.यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झेंड्याचे वितरण केले जाणार आहे यासाठी 29 रुपयांमध्ये हा झेंडा मिळणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे
औरंगाबाद जिल्ह्यात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे यामध्ये जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना प्रशासनाच्या वतीने या झेंड्याचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे घरावर लावण्यात येणाऱ्या झेंड्यांसाठी वेळेची कुठलीही नियमावली असणार नाही., मात्र झेंड्याचा अपमान होणार नाही याची काळजी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.
असे होणार वितरण
ग्रामीण भागात या झेंड्याचे वितरणासाठी ग्रामपंचायतला या झेंड्याचे वितरण प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतर ग्रामपंचायत हे सर्व झेंडे सामान्य नागरिकांना देण्यात येणार आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम देशभर घेण्यात येत आहे औरंगाबादमध्ये तिसगावच्या उपसरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हा झेंडा देण्यात आला.
झेंड्याचा आकार काय?
या झेंड्याचा आकार तीन बाय दोन असा आहे.यावेळी तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे यांनी सांगितले की आम्हाला हा झेंडा सर्वात पहिल्यांदा मिळाल्यामुळे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या गावातील प्रत्येक घरावर आम्ही हा झेंडा लावणार आहोत तसेच शासनाच्या या मोहिमेत उत्साहाने सहभाग नोंदवणार आहोत यावेळी जे सरपंच हे झेंडे घेणार नाहीत अशा ग्रामपंचायतीवर अपात्रतेची कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांनी दिली आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.