आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूर असणाऱ्या भावासाठी विशेष अमृत बंधन राखी:पोस्ट विभागाचा उपक्रम, छावणी येथील कार्यालयात उपलब्ध

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राखी पौर्णिमा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात राखी खरेदी करण्यासाठी अलोट गर्दी होत आहे. यात पोस्ट विभागाही मागे नसून प्राथमिक स्वरूपात ४०० विशेष अमृत बंधन राखी ग्राहकांसाठी छावणी पोस्ट कार्यालयात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. मात्र, यासाठी प्रति राखी ३० रुपये खर्च करावा लागेल. मागणीनुसार राखी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संपूर्ण देश विविध माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तसेच रक्षाबंधनाची जोरदार लगबग सुरू झाली आहे. बहिण भावासाठी राखी करत आहे. बहिण व भाऊ कामानिमित्त, नोकरी, उद्योग व्यवसायानिमित्त बाहेर गावी असता. जे प्रत्यक्ष औक्षण करून राखी बांधण्यासाठी उपस्थित राहु शकत नाही त्यांना बाय पोस्ट राखी पाठवली जात आहे. यात महाराष्ट्र डाक विभागाने विशेष अमृत बंधन राखी तयार करून ग्राहकांसाठी छावणी डाक कार्यालयात उपलब्ध करून आगळावेगळा सहभाग नोंदविला आहे.

आकर्षक सजावट

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये विशेष योगदान असणाऱ्या व देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय जवानांचे टपाल तिकिट आणि अमृत महोत्सवाचा लोगो विशेष अमृत बंधन राखीवर आकर्षक पद्धतीने छापण्यात आले आहे. देश सेवेसाठी अमृत बंधन राखीचा वापर करावा, असे आवाहन पोस्टमास्तर जनरल यांनी केले आहे. तर ग्राहकांसाठी कफियतदरात अमृत बंधन राखी मिळू लागली आहे. तसेच खरेदी केलेली राखी लगेच पाठवणे शक्य होत आहे. यामुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर झाले आहे. तर यातून पोस्टला केंद्र सरकारचा उपक्रम प्रभावीपणे राबवणे, ग्राहकभिमूख सेवा प्रदान करून त्यांचा विश्वास वृद्धिंगत करणे व महसूल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...