आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. शेवडे यांची माहिती:डाव्यांच्या घुसखोरीमुळे खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासाची पार्श्वभूमी न पाहता, त्याची तपासणी न करता खोटा इतिहास खरा म्हणून लादला जात आहे. शिक्षण क्षेत्रात डाव्यांच्या घुसखोरीमुळे हा प्रकार होत असल्याचा आरोप व्याख्याते, इतिहासकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केला.स्वरलहरी निर्मित, कलारंग प्रस्तुत कार्यक्रमात शनिवारी स्व. शोभा पाडळकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त वरद गणेश मंदिराच्या सभागृहात प्रेमस्वरूप आई आणि मातृगौरव पुरस्कार सोहळा झाला. त्यानंतर वीरांगना राणी लक्ष्मीबाई या विषयावर डॉ. शेवडे यांचे व्याख्यान झाले. त्यात त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, काही इतिहासकार सावरकरांचा माफीनामा फडकवतात. परंतु गांधींजींच्या अनेक पत्रातही तसाच मायना आहे हे विसरून चालणार नाही.

झाशीच्या राणीचे पती गंगाधर नेवाळकरांना बायल्या म्हणून बदनाम करण्यात आले. नेवाळकरांच्या नंतर झाशी वाचवण्यासाठी राणी लक्ष्मीबाईने इंग्रजी सत्तेशी लढा पुकारला होता, हे विसरून जाणार नाही. डॉ. सावजी म्हणाल्या की, आईला काय म्हणावे असे अजून कळत नाही. जन्मभूमीच्या नात्यातून संस्कृती जपली. त्यातून मातांनी मम सुखातून सर्व जन सुखापर्यंत पोहचवले.

सारिका कुलकर्णी यांनी गणेश स्तवन केले. या वेळी डॉ. मधुश्री सावजी, विजय देशमुख, चित्रगुप्त पाडळकर, प्रा. स्नेहल पाठक, स्मिता कऱ्हाडे, इंदिराबाई दांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते इंदिराबाई दांडगे, प्रा.स्नेहल पाठक, स्मिता कऱ्हाडे यांना उस्मानाबाद येथील पुत्रवल्लभा देवीचे शिल्प असलेली प्रतिकृती देण्यात आली. दीपाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, शीतल पाडळकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास कुलकर्णी, पल्लवी पाडळकर, संदीप पाडळकर, शीतल पाडळकर, सारंग पाडळकर यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...