आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व सेवा-सुविधा:शहरात एक हजार एकरांवर उभारणार शैक्षणिक-वैद्यकीय हब

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व सेवा-सुविधा एकाच छताखाली उभारत नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन ठिकाणी १ हजार एकर जागेवर शैक्षणिक आणि वैद्यकीय हब स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन महिन्यांत याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या शैक्षणिक केंद्रामध्ये सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये, कौशल्य, संशोधन संस्थांचा समावेश असेल. तसेच आरोग्य सेवा केंद्रात अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक रुग्णालये, गंभीर आजारासाठी देखभाल केंद्रे, संशोधन आणि निदान केंद्रे, वैद्यकीय आणि परिचारिका संस्था असतील.