आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद क्राईम:फारोळ्यात वृद्ध दांपत्याची गळा दाबून केली हत्या, मृत महिलेच्या अंगावरील दागिने नेले ओरबाडून

बिडकीनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण तालुक्यातील फारोळा गावात वृद्ध दांपत्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने चोरांनी घरात प्रवेश करून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. भीमराव खरनाळ (६५) आणि शशिकला खरनाळ (५८) अशी या दांपत्याची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद-पैठण महामार्गावरील फारोळा गावातील विजयनगरात भीमराव खरनाळ आणि शशिकला खरनाळ हे दांपत्य राहत होते. शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांना मारहाण केली. त्यानंतर दोघांची गळा दाबून हत्या केली.

ही घटना सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथक आणि ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. दोघांचेही मृतदेह बिडकीन येथील शासकीय घाटी रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. चोराने मृत महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेले.

त्यामुळे हा सर्व प्रकार चोरीच्या उद्देशाने घडला असावा आणि महिलेने त्यास विरोध केल्यामुळे दोघांची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रविवारी जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी मतदान होते. फारोळ्याज‌वळील बिडकीन गावातही मतदान होते. यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. याच काळात वृद्ध दांपत्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची बातमी कळाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्हीची पाहणी

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळ औरंगाबाद-पैठण रोडपासून हाकेच्या अंतरावर असल्याने या रोडवरील दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिस तपासून पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...