आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकाऊ वस्तूंचा वापर:विज्ञानाच्या गोडीसाठी मुरूमखेडावाडी शाळेत शनिवारी दप्तरमुक्तीचा प्रयोग

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना मर्यादेच्या चौकटीत न बसवता त्यांना मुक्त आनंद घेता यावा यासाठी औरंगाबादपासून ३७ किलोमीटर अंतरावरील मुरूमखेडावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त विज्ञान शाळा भरवली जाते. त्याऐवजी रोबोटिक्स कारनिर्मिती, ड्रोन फ्लाइंग प्रात्यक्षिक, पेरिस्कोपचे प्रात्याक्षिक शनिवारी दिले जाते.

मुलांनी नुकताच पेरिस्कोप (परिदर्शक) टाकून दिलेल्या वहीच्या पुठ्ठ्यांपासून तयार केला आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर करत विज्ञानाची जादू शिकवली जाते. २५ कुटुंबांची वस्ती असलेल्या या दुर्गम भागात आधी ९ विद्यार्थी शाळेत होते. आता पहिली ते चौथीत २८ विद्यार्थी शिकत आहेत, असे शिक्षक पी. के. राजपूत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...