आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळीमा फासणारी घटना:आठ वर्षाने मोठ्या असणाऱ्या मेहुणीवर अत्याचार; 3 दिवसांची पोलिस कोठडी

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतः पेक्षा आठ वर्षाने मोठ्या असणाऱ्या सावत्र मेहुनीवर अत्याचार करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपी ज्ञानेश्वर देवके (26 रा.वाळूज एमआयडीसी परिसर) विरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात ३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेच्या दिवशी 27 जुलै रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी जाणाऱ्या आरोपीने महिलेचा पती व मुलगा घरात दिसत नसल्याने त्यांच्या बद्दल चौकशी केली असता मुलगा कंपनीत कामाला तर पती बाहेरगावी गेल्याचे मेहुनीने दाजीला सांगितले. मेहुनी घरी एकटीच असल्याची संधी साधत वाईट हेतूने ज्ञानेश्वरने मेहुनीसोबत अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या किळसवाण्या प्रकारामुळे घाबरलेली मेहुनीने ज्ञानेश्वरला दूर लोटताच त्याने मेहुनीला मारहाण करत गप्प बसण्यास सांगितले. अन्यथा तुझ्या पती व मुलाला तसेच भावाला ठार मारले अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने मेहुणीवर अत्याचार केला. तसेच या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये बनवला. तू जर या घटनेबाबत कोणास काही सांगितले तर हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत तो निघून गेला.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

घटना घडल्यानंतर घरी परतलेल्या पती व मुलाने आई घाबरलेली व अबोल राहत असल्याने तिच्याकडे चौकशी केली मात्र, त्यांना तिने काहीच सांगितले नाही. आठ दिवस उलटून गेली तरीही पत्नी कायम अबोल व नाराज राहत असल्याने पपतीने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता ओक्साबोक्शी रडत महिलेने सर्व घटना पतीला सांगितली. त्यानंतर पतीने तिला धीर दिला त्यानंतर पीडित महिलेने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी दाजी विरोधात कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन जेरबंद करत न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...