आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज 42 नव्या रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 1540 पोहोचली; घाटीत एकाचा मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात ६८ पॉझिटिव्ह, परभणीत एका रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 42 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1540 झाली आहे. 

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : भवानी नगर, जुना मोंढा (4), कैलास नगर, गल्ली नं. दोन (3), एन सहा, सिडको (3), जाफर गेट, जुना मोंढा (1),  गल्ली नं.17, संजय नगर, मुकुंदवाडी (1), गल्ली नं. चार रहीम नगर, जसवंतपुरा (1), व्यंकटेश नगर, जालना रोड (1), समता नगर (1),  नवीन बायजीपुरा (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (1),किराडपुरा (3), पिसादेवी रोड (1), बजाज नगर (1), देवळाई परिसर (1),  नाथ नगर (1), बालाजी नगर (1), हमालवाडी (1),  जुना बाजार (2), भोईवाडा (1), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (2), सुराणा नगर (1),  अझम कॉलनी (1), सादात नगर (1), महेमुदपुरा, हडको (1), निझामगंज कॉलनी (1), शहागंज (1), गल्ली नं. 24 संजय नगर (1), बीड बायपास रोड (1), स्वप्न नगरी (1), अन्य (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये  24 महिला आणि 18 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

घाटीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) औरंगाबाद शहरातील निझामगंज कॉलनी येथील 52 वर्षीय महिला रुग्णाचा 30 मे रोजी सायं.5.20 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 59 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर  खासगी रुग्णालयात 10, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 70 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी ३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १४९८ वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेला रुग्ण हडकोतील मुझफ्फरनगरमधील आहे. शुक्रवारी शहरात ५२ रुग्ण आढळले होते. शनिवारी एकही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आजवर ९६७ रुग्ण बरे झाले आहेत.

मराठवाड्यात ६८ पॉझिटिव्ह, परभणीत एका रुग्णाचा मृत्यू

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत शनिवारी ६८ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. जालना जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ५ जणांचे, तर शनिवारी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान एका न्यूमोनियासदृश रुग्णाचा मृत्यू झाला. परभणीत वाघी बोबडे (ता. जिंतूर) येथील ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले. वैजापुरात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हिंगोलीत गरोदर महिलेला संसर्ग झाला. उस्मानाबादेत शनिवारी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. लातूर जिल्ह्यातही रात्री उशिरा ७ नव्या रुग्णांची नोंद झाली. नांदेडमध्ये एक रुग्ण आढळला.

बातम्या आणखी आहेत...