आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज जोडण्यासाठी पुढाकार:सुवर्णकार समाजातर्फे ‘आदर्श सुवर्ण नात्यां'चे कल्पक व्यासपीठ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या काळात समाजातील व्यक्ती एकमेकांपासून दुरावत चालल्या आहेत. दुसरीकडे समाजात गरजवंत, दुर्बल कुटुंबीयांना आधाराची गरज असते. युवा वर्गांना रोजगार, नोकरी, व्यवसायाचे मार्गदर्शन हवे आहे. या गरजा ओळखून अखिल महाराष्ट्र सुवर्णकार विकास महासंघातर्फे आदर्श सुवर्ण नात्यांचे व्यासपीठ माध्यमातून समाज घटकांसाठी विविध उपक्रम राबवणार आहेत.

महासंघातील महिला जिल्हा आघाडी, महिला शहर आघाडी, जिल्हा पुरुष आघाडी, शहर आघाडी, युवा शहर आघाडी अशा पाच समित्यांमध्ये कार्य चालत आहे. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून समाजाचे प्रबोधन केले जाणार आहे. संस्थापक अध्यक्ष विजय कल्याणकर, अशोक क्षीरसागर, भरत कल्याणकर, नंदू डहाळे, कार्याध्यक्ष उमेश क्षीरसागर संपूर्ण अभियानासाठी सहकार्य करीत आहेत.

आदर्श सुवर्ण नात्यांच्या व्यासपीठांतर्गत काय असेल समाजातील कुटुंबांना जोडण्यासाठी व संत नरहरी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जय नरहरी नावाचे स्टिकर प्रत्येक घराला, दुचाकी, चारचाकी आणि व्यवसायाच्या ठिकाणी लावले जाणार आहेत. सुरुवातीला १ हजार स्टिकर छापले असून ४ हजार अजून छापले जाणार आहेत. स्वावलंबी होण्यासाठी पुढाकार घेतले जाईल.

रोजगार, नोकरीसाठी शिबिरे युवकांना व्यवसायाचे मार्गदर्शन, नोकरीविषयक मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत. निराधार महिलांसाठी रोजगारासाठी मदत केली जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर लग्नपत्रिका समाजातील गरीब कुटुंबातील व्यक्ती मेल्यानंतर दहाव्यापर्यंत व्यवसाय बंद पडतो. अशा कुटुंबाला महिनाभराचा किराणा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात मुलींच्या लग्नाची पत्रिका न छाापता व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिले निमंत्रण जाणार आहे.

नवीन पिढीला नात्यांवर प्रबोधनाची गरज प्रबोधन काळाची गरज बनली आहे. त्यात नवीन पिढीचे नातेसंबंधांबाबत प्रबोधन करणार आहोत. समाजातील विविध गरजवंतांसाठी उपक्रम राबवत आहोत. -विजय कल्याणकर, अध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...