आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • An Intellectual Feast Should Be Held At Every Corner To Increase Intelligence! | Marathi News

मॅनेजमेंट फंडा:बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यावर व्हावी बौद्धिक मेजवानी!

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली विमानतळावर रविवारी दुपारी ५० हून अधिक प्रवाशांना विमानाजवळील बसमध्ये २० मिनिटे थांबावे लागले, कारण हाऊसकीपिंगच्या कर्मचाऱ्यांनी विमानाची सफाई ​​केली नव्हती. प्रचंड उकाडा असल्याने प्रवासी त्रस्त झाले होते. यादरम्यान दुसरी बस दुसऱ्या लॉटमधून ३० प्रवाशांना घेऊन पहिल्या बसच्या मागे उभी राहिली. दरम्यान, विमान सुटण्याच्या तयारीत होते आणि तेथे एक व्हीआयपी प्रवासी असल्याने ग्राउंड स्टाफला आधी दरवाजा दुसऱ्या क्रमांकाचा उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या. या तथाकथित ‘पक्षपाती’पणामुळे पहिल्या बसमधील अनेक प्रवासी नाराज होऊन तक्रारी करू लागले, पण अवघ्या ३० सेकंदांनी त्यांच्या बसचा दरवाजाही उघडला आणि ते सगळे पायऱ्या चढण्याच्या बेतात असलेल्या स्मार्ट दिसणाऱ्या व्हीआयपीला मागे टाकण्यासाठी धावून लागले. प्रवाशांनी घाई केल्याने ते थांबले. योगायोगाने त्यांना गर्दीत एक मित्र दिसला आणि बाकीच्या प्रवाशांना आधी विमानात जाता यावे म्हणून ते त्याच्याशी बोलू लागले. बोर्डिंग पूर्ण होताच ते व्हीआयपी येऊन माझ्या बाजूला बसले. ते केंद्रीय जलशक्ती मंत्रालयात राजस्थानमधील जोधपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत होते.

आम्ही लगेच राजकारण आणि देशातील पाण्याचे भवितव्य यावर बोलू लागलो. त्या संपूर्ण ९० मिनिटांच्या संभाषणात त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द एखाद्या शांत नदीसारखा आपल्या गतीने वाहणारा होता. त्यांनी विरोधकांवर कोणतीही सौम्य टीका न करता त्यांना ‘जी’ संबोधले. त्यांचे मंत्रालय जे काही करत आहे, त्याचे सर्व श्रेय त्यांनी आपल्या नेत्याला म्हणजेच पंतप्रधानांना दिले. पत्रकार या नात्याने मी वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील पाण्याच्या उपलब्धतेबद्दल भीतिदायक आकडेवारी सादर केली तेव्हा ते चतुराईने हसले आणि त्यांनी शांतपणे आकडेवारीसह उत्तर दिले.

ते म्हणाले, भारतामध्ये जगातील १७.५% लोकसंख्या असूनही आपला घरगुती पाणी वापर फक्त ५% आहे आणि औद्योगिक वापर ६% आहे, तर आपण सिंचनासाठी ८९% पाणी वापरतो. या भागातच आपल्याला पाण्याचा अपव्यय व्यवस्थापित करण्याची गरज आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ‘आपल्याकडे पाण्याची खरी समस्या नाही आणि मंत्रालयाला किमान आगामी भविष्यात घरगुती वापरासाठी पाण्याचे संकट दिसत नाही, कारण पुढील दोन-तीन दशकांसाठी आम्ही ब्लूप्रिंट तयार करत आहोत. आपल्या दैनंदिन जीवनशैलीत आपल्याला पाणी व्यवस्थापनाची सवय लावायची आहे, पाण्याबद्दल घाबरून जाण्याची नाही. मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशमधील पाणी करारापासून ते कर्नाटक व तामिळनाडू, गुजरात सरोवर प्रकल्प आणि इतर अनेक मुद्द्यांवर आमची चर्चा सुरू राहिली. चांगल्या व्यवस्थापन पद्धतींनी भारत भविष्यातील पाण्याची मागणी सहजपणे पूर्ण करू शकतो, असा त्यांना विश्वास होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘एक निश्चित जीवनशैली अंगीकारणे, त्यामध्ये पर्यावरणाचा आदर करणे आणि निसर्गाच्या रक्षणासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे ही आपली जबाबदारी आहे.’ सुरुवातीला ९० मिनिटांचे ते संभाषण मला रस्त्यावरील गप्पांसारखे वाटले, परंतु मी विमानातून उतरलो तेव्हा ती माझ्या डोळ्यांना, कानांना आणि मनासाठी एक बौद्धिक मेजवानी ठरली.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...