आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारा अभावी मृत्यू:काविळीने अनोळखी तरुणाचा रस्त्यावर मृत्यू

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कावीळ आजार जडून उपचाराअभावी अशक्त झालेल्या अंदाजे ३२ ते ३५ वयोगटातील तरुणाचा रस्त्यावर मृत्यू झाला. हा तरुण १ ऑगस्ट रोजी कासारी बाजारात जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच, त्याला कावीळ जडल्याचा अहवाल दिला. सडपातळ बांधा, निमगोरा रंग, वाढलेले केस, उंची ५ फूट ५ इंच असून उजव्या मनगटावर नाना शब्द गोंदले असून त्याने निळ्या व पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. नातेवाइकांनी संपर्क साधण्याचे आवाहन सिटी चौक ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल डी. बी. फुके यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...