आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प 2023:लघुउद्योजकांमध्ये आनंद, करसवलत व प्रोत्साहन योजनांचे केले स्वागत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यम व लघुउद्योगांचे शहर समजल्या गेलेल्या औरंगाबादमधील लघु व नवउद्योजकांनी या अर्थसंकल्पाचे विशेष स्वागत केले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर शहरातील मान्यवरांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

लघुउद्योजकांना प्रोत्साहन लघुउद्योजकांना दहा वर्षे करसवलत, तीन कोटी उलाढाल असणाऱ्या मायक्रो उद्योगांना सवलत ही यातील जमेची बाजू आहे. कारागिरांसाठी कौशल्य सन्मान योजनेची घोषणा नवीन आहे. नवउद्योजकांसाठीची करसवलत चार वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. -डी. एस. काटे, अर्थविषयक अभ्यासक

शाश्वतकडे नेणारे बजेट शेती उत्पादन, त्यासाठीपूरक तंत्रज्ञान विकास, पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी, लघु व दीर्घकालीन उपाययोजना याद्वारे या बजेटने देशाचा पुढील २५ वर्षांचा रोड मॅप तयार केला आहे. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर आगामी काळात भर द्यावा ही अपेक्षा. - प्रशांत देशपांडे, अध्यक्ष, औरंगाबाद फर्स्ट

स्टार्टअपसाठीचे स्वागतार्ह कृषिपूरक स्टार्टअपसाठी उपाययोजना तसेच फंड साहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक खतांना प्रोत्साहन बियाणे, कृषिविषयक आणि इतर उद्योगासाठी प्रोत्साहनाची अपेक्षा पूर्ण झाली नाही. -समीर मुळे, अध्यक्ष, सियाम

अर्थव्यवस्थेला गती देणारा उद्योगांच्या दृष्टीने येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक सुविधांमुळे अर्थव्यवस्थेला गती येईल. स्किल डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केल्याने येणाऱ्या काळात उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळणार आहे. - राहुल मोगले, सचिव, मसिआ

टीडीएसची मर्यादा घटवली ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत हा मोठा दिलासा आहे. स्टार्टअप्सच्या प्रोत्साहनासाठी करांच्या सवलती ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवल्या आहेत. अपिले वेगाने निकाली लागावीत यासाठी सहआयुक्तांची नवीन टीम उभारणार आहे. ईपीएफ काढण्यावरील ३० टक्के टीडीएस २० टक्क्यांवर केला. - गणेश भालेराव, आयसीएआय

बातम्या आणखी आहेत...