आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोजगाराची संधी:रस्त्याने जात असताना एका व्यक्तीची बंद पडलेली मोटार सायकल दुरुस्ती अनंता आणि सुनीलसाठी ठरली रोजगाराची संधी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउनचा सदूपयोग: विदयार्थ्यांनी तंत्राकौशल्यातून मिळविला रोजगार

लॉकडाउनच्या आव्हानात्मक परिस्थीतीत अनेक सुशिक्षीत व कौशल्यप्राप्त युवकांचे रोजगार गेले व अनेकांनी गावाकडचा रस्ता धरला. मात्र या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांच्या मदतीला सिडको परिसरातील एमआयटी महाविद्यालीयाने आत्मविश्वासाचा हात दिला आहे. काही विदयार्थ्यांनी या माहामारी च्या परिस्थीतीला हार न मानता त्याचा धैर्याने सामना करत आपल्या तांत्रिक कौशल्यातून स्वत:चे तांत्रिक ज्ञान सिदध करुन दाखवले.

महाविदयालयाच्या  बी.एस्सी. ऑटोमोबाइल आणि वर्कशॉप टेक्नॉलजी या तृतीय वर्ष अभ्यासक्रमातील अनंता सावते व सूनील जाधव या विदयार्थ्यांनी वेळेचा सदूपयोग करत हजारो रूपये कमावण्याची किमया केली.

याविषयी बोलतांना सदर विदयार्थ्यांनी सांगितले की, कोरोनामूळे लॉकडाउन जाहीर झाल्यामूळे परीक्षा अनिश्चीत काळासाठी लांबणीवर पडल्या. त्यामुळे सुरूवातीला आम्ही थोड अस्वस्थ झालो त्यातच परिक्षा लांबल्यामुळे अभ्यासाविषयी सुद्धा अनिश्चितता निर्माण झाली. अशा आव्हानात्मक परिस्थितीला एक विदयार्थी म्हणून कसे सामोरे जावे असा विचार करत असतानाच एक संधी चालून आली. रस्ताने जात असताना एका व्यक्तीची बंद पडलेली मोटार सायकल चालू करून दिली. आमचे कौशल्य पाहून ती व्यक्ती खूप खूश झाली व त्यांनी आमच्यासमोर त्या जून्या मोटरसायकलला पुर्नबांधणी करून नवे रूप देण्याचा प्रस्ताव मांडला. विदयार्थ्यांचा महाविदयालयात संपादन केलेल्या ज्ञानावर व तांत्रीक कौशल्यावर पूर्ण विश्वास होता  म्हणून  तो प्रस्ताव लगेच स्विकारला त्यांनंतर विविध तांत्रिक प्रक्रिया व जोडणीनंतर त्या जून्या मोटरसायकलच रूपच बदलून टाकल. यामुळे खुश होउन सदर व्यक्तीने विदयार्थ्यांना पंधरा हजार रूपये दिले. हा विदयार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता असे ते म्हणाले.

त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये एक मोठा आत्मविश्वास प्राप्त झाला व त्यानंतर अशाच प्रकारचे दोन - तीन कामे करून जवळपास पंचवीस - तीस हजार रूपयांची कमाई  लॉकडाउन या काळात केली आहे. या सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही पुस्तकी परिक्षेला सामोरे न जाता विदयार्थ्यांना तंत्रकौशल्य सिदध करता आले. याचा आम्हाला खूपच आनंद झाला. या यशाचे सर्व श्रेय आमचे महाविदयालय व तेथील प्राचार्य, प्राध्यापक वृंद व सर्व मित्रांना जाते , असे विदयार्थ्यांनी  सांगितले.  

या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन एम. आय. टी. चे डायरेक्टर जनरल प्रा. मुनिश शर्मा, प्राचार्य डॉ. महेंद्र कोंडेकर, विभाग प्रमुख प्रा. वैभव जोशी, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यानी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...