आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत माथाडी कामगारांमध्ये रोष:शासकीय धान्य गोदामातील मजूरांचे पगार थकले, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातील 14 शासकीय गोदामातील माथाडी कामगारांचे पगार जून महिन्यापासून झालेले नाहीत. त्यामुळे या माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. मराठवाडा लेबर युनियनचे अध्यक्ष सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. वेळेवर पगार न करणे यामुळे माथाडी कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे.

जिल्ह्यातील माथाडी कामगारांचे पगार वेळेवर करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत वारंवार चर्चा झाली. मात्र यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. सातत्याने माथाडी कामगार चर्चा करतात. मात्र त्यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे ज्या गोदामांमधील कर्मचाऱ्यांचे पगार केले जात नाहीत त्यांचे कंत्राट रद्द करण्यात यावेत अशी मागणी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.

200 कामगारांचे पगार थकले

माथाडी कामगारांचा पगार दरमहा 5 तारखेच्या पूर्वी करण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जिल्ह्यातील 200 माथाडी कामगारांचा पगार प्रलंबित आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 14 शासकीय गोदाम आहेत. या सर्व शासकीय गोदामात माथाडी कामगार काम करतात. या माथाडी कामगारांचे जून आणि जुलै या दोन महिन्याचे पगार अजूनही झालेले नाहीत. त्यामुळे या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

बेमुदत आंदोलनाचा इशारा

माथाडी कामगारांचा प्रश्न न सुटल्यास बेमुदत ही आंदोलन करण्याचा इशारा सुभाष लोमटे यांनी दिला आहे. या आंदोलनात देविदास कीर्तीशाही, प्रवीण सरकटे, जगन भोजने, शेख रफिक, आशाबाई डोके, संतोष म्हेसमाळे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...