आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया:घाटीच्या सुपरस्पेशालिटीत अँजिओग्राफी यशस्वी ; मूत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागाचा बाह्यरुग्ण विभाग

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवारी साहेबराव दाभाडे (५२) यांच्यावर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली. औरंगाबाद, यवतमाळ, अकोला आणि लातूर या चार अतिविशेष उपचार रुग्णालयांपैकी औरंगाबादमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आठवड्यातून तीन दिवस हा विभाग सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती सुपरस्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली.

घाटीत गेल्या तीन वर्षांपासून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू आहे. मराठवाड्यातील हे सर्वात मोठे हॉस्पिटल असून इथे हृदयरोग व न्यूरॉलॉजी विभाग सुरु करण्यात आला आहे. १५० कोटी रुपये खर्चून हे हॉस्पिटल बांधले. गेल्या १० फेब्रुवारीला घाटीत हृदयरोग विभाग सुरू झाला. आता सहा महिन्यांनंतर अँजिओग्राफी सुरू करण्यात आली आहे. डॉ. चौधरी म्हणाले, कार्डिओलॉजिस्ट डॉ. गणेश सपकाळ यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. ती अर्धा तास चालली. सध्या २५ रुग्ण वेटिंगवर आहेत. लवकरच अँजिओप्लास्टीही सुरू करण्यात येणार आहे. सुपरस्पेशालिटीत तीन दिवस शस्त्रक्रिया सुरू राहतील, असे नियोजन करण्यात येत आहे. या वेळी नर्स छाया कपिलेश्वरी, नाथा चव्हाण, लीला वाघमारे, नितीन पठारे यांच्यासह सहा नर्सनी साहाय्य केले. शस्त्रक्रियेसाठी कॅथलॅब टेक्निशियन पूजा जगताप, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. ज्योती कुलकर्णी यांच्यासोबत दोन निवासी डॉक्टर होते.

रेशन, आधार कार्ड सोबत आणा : डॉ. वर्षा रोटे म्हणाल्या, आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शस्त्रक्रियांसाठी पाठपुरावा करत होतो. आता रुग्णांवर मोफत उपचार होतील. रुग्णांनी रेशन कार्ड, आधार कार्ड, फोटो आेळखपत्र सोबत आणावे.

बातम्या आणखी आहेत...