आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाचा खून:रेलगावच्या युवकावर प्राण्याचा हल्ला नव्हे, खून; आराेपी अटकेत

सिल्लोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रेलगाव येथील युवकाच्या खुनाचा २४ तासांत छडा लावण्यात सिल्लोड ग्रामीण पोलिसांना यश आले. या खुणाचा आरोप असणाऱ्याला सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणेश कैलास चव्हाण (२४) आराेपीचे नाव आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील रेलगाव येथील रवींद्र अंबादास काजळे या युवकाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात हाेता. परंतु, सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून आराेपीला बेड्या ठाेकल्या आहेत. युवकाचा खून झाला असल्याचा चर्चेने पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. तेव्हा हा खून गावातीलच गणेश कैलास चव्हाण याने केल्याचे पोलिसांना समजले. यावरून सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी आरोपी गणेश चव्हाण यास अटक केली. त्याने रागाच्या भरात खून केल्याचे सांगितले. न्यायालयाने मंगळवारी आरोपी गणेश चव्हाण यास न्यायालयासमोर उभे केले असता त्यास ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...