आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभेत अर्ज स्विकृतीला 31 आॅगस्टपर्यंत मुदवाढ

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेअंतर्गत २०२०-२१ मध्ये विषेश घटक योजनांसाठी १ ते ३० जुलै दरम्यान अर्ज मागवण्यात आले होते. १४ आॅगस्ट रोजी झालेल्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभेत अर्ज स्विकृतीला ३१ आॅगस्टपर्यंत मुदवाढ देण्यास सभापती व उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी मान्यता दिली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. एस. डी. कांबळे यांनी सांगितले.

विशेष घटक योजना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जणावरे गट वाटप, शेळीगट वाटप, १०० टक्के अनुदानावर पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण, आदीवासी क्षेत्राबाहेरील शेळीगट वाटप योजनास एकात्मीक कुक्कुट विकास योजनेसाठी आता ३१ आॅगस्टपर्यंत पंचायत समितीत अर्ज स्विकारल्या जाणार असुन १ ते ५ सप्टेंबर दरम्यान तालुकास्तरावर छाणणी होईल. तर ६ ते १० सप्टेंबर दरम्यान जिल्हा परिषदेत प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अशी माहीती पशुधन विकास अधिकारी डाॅ. रत्नाकर पेडगांवकर यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...