आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृतीचा सत्कारमूर्तींकडून संदेश:पाळीव श्वानांची सेवा करणाऱ्या चौघांना पशुसेवा कृतज्ञता पुरस्कार

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मरासिम ग्रुप ऑफ केनल्सच्या वतीने बुधवारी (२३ नाेव्हेंबर) पशुसेवा कृतज्ञता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अलंकार हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. अनिल भादेकर, मुकुंद जोशी, फारुख शेख, जमीर पठाण यांचा पाळीव श्वानांची अनेक वर्षे सेवा केल्याबद्दल गौरव करण्यात आला. ‘चांगल्या श्वानाची ब्रीडिंग करण्यासाठी श्वानप्रेमींनी अभ्यास करायला पाहिजे. विविध श्वानांच्या प्रजातींची माहिती घेणे आवश्यक आहे. श्वान विक्रीनंतर त्याच्या आजाराविषयी माहिती घेण्याची जबाबदारीही घ्यायला हवी,’ अशी अपेक्षा सत्कारमूर्तींनी व्यक्त केली.

४२ वर्षे उपचार, प्रदर्शनही गेल्या ४२ वर्षांपासून श्वानांवर उपचार आतापर्यंत दोन प्रदर्शन भरवले. श्वानांच्या डायरिया, डोळ्यांचे आजार, डायबिटीस, जॉइंट ऑपरेशन, कॅन्सर आदी आजारांवर उपचार इतरांनाही मदत करतो. मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी निर्बीजीकरण करणारे सेंटर वाढवणे गरजेचे. डॉ. अनिल भादेकर, श्वानप्रेमी.

विशिष्ट ब्रीडिंगवर लक्ष १९८५ पासून लॅब्रॉडॉर श्वानावर काम. श्वान कसे असावे, कोणत्या श्वानाशी नाते जुळवले पाहिजे, दोषमुक्त श्वान कसे होईल यावर काम करत आहे. पुणे, मुंबई, इतर जिल्ह्यांत ब्रीडिंग केलेले श्वान दिले. इतर श्वानप्रेमींमध्ये जनजागृती अनेक वर्षांपासून करतोय. मुकुंद जोशी, श्वानप्रेमी

३५ वर्षांपासून ब्रीडिंग ३५ वर्षांपासून जर्मन शेफर्ड, लॅब्रॉडॉर श्वानाच्या जातींवर काम करत आहे. त्यांचे ब्रीडिंग करणे, ज्यांना दिले त्यांच्याकडील श्वानांची देखभाल करत आहे. आमदार, मंत्री यांच्याकडे असलेल्या श्वानांची देखभालही करत आहे. आतापर्यंत १०० हून अधिक श्वान अनेकांना दिले आहेत. फारुक शेख, श्वानप्रेमी

१० वर्षांपासून औषधी सेवा गेल्या दहा वर्षांपासून मी श्वानांना लागणाऱ्या औषधी पुरवण्यासाठी एका कंपनीत काम करतोय. श्वानाची आवड असल्यामुळेच नोकरीसाठी हे क्षेत्र मी निवडले आहे. कोणत्या प्रकारच्या श्वानांना कोणती औषधी लागू पडेल याचे ज्ञान मिळवून मी इतरांना सांगतो. जमीर पठाण, श्वानप्रेमी

बातम्या आणखी आहेत...