आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मरणोत्तर गौरव:अण्णा भाऊ साठेंना एमजीएम विद्यापीठातर्फे डी.लिट ; दीक्षांत समारंभात कुटुुंबियांना प्रदान करणार

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील पहिलेच स्वयंअर्थसाहाय्यित खासगी विद्यापीठ असलेल्या एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ येत्या रविवारी (२७ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठातर्फे प्रख्यात साहित्यिक आणि विचारवंत अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर मानद वाङ‌्मय पंडित (डी. लिट.) पदवी देण्यात येईल. या समारंभात अण्णा भाऊंचे कुटुंबीय ही पदवी स्वीकारतील, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर समारंभाचे प्रमुख अतिथी असतील. एकूण ५३४ विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल.डॉ. आशिष गाडेकर यांनी सांगितले की, ‘विद्यापीठ सुरू होऊन तीन वर्षे झाली. २०२०-२०२१ या कालावधीतील विविध शाखांच्या पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांना या समारंभात पदवी प्रदान करण्यात येईल. यात पदवीधरच्या १०९, पदव्युत्तर पदवीधर २९१, पदविकाधारक १३१ आणि प्रमाणपत्रधारक ३ विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्यापैकी बेसिक अँड अप्लाइड सायन्सच्या १३६, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे ६०, मॅनेजमेंट अँड कॉमर्सचे २३०, परफॉर्मिंग आर्ट‌्सचे १५ आणि सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विद्याशाखेच्या ९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक दिले जाईल.’या पत्रकार परिषदेस कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके आदी उपस्थित होते.

हँडमेड पेपरपासून पदवी प्रमाणपत्राची निर्मिती परीक्षा नियंत्रक कर्नल प्रदीपकुमार यांनी सांगितले की, ‘पदवी प्रमाणपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी हँडमेड पेपर वापरण्यात आला असून सिक्युरिटी फीचर्सही आहेत. खादीप्रमाणे त्याचे टेक्श्चर आहे. मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही भाषांत हे प्रमाणपत्र असेल.’

दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम { रुक्मिणी सभागृहात दीक्षांत समारंभ { सकाळी ७ ते ९ : विद्यार्थ्यांची नोंदणी आणि पोशाख वितरण. { सकाळी १०:१५ वाजता : विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून दीक्षांत मिरवणूक निघेल. { सकाळी १०:३० ते दुपारी १:३० : विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल आणि मान्यवरांची भाषणे.

बातम्या आणखी आहेत...