आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह:योगी डिव्हाइनच्या भागवत सप्ताहात अन्नकूट उत्सव, श्रीकृष्ण रासलीला अन‌ रुक्मिणी विवाह

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

योगी डिव्हाइन सोसायटी पवई यांच्यातर्फे जबिंदा ग्राउंडवर आयोजित भागवत कथा सप्ताहात बुधवारी सहाव्या दिवशी श्रीकृष्ण रासलीला, रुक्मिणी विवाहाचे देखावे सादर करण्यात आले. गोवर्धन उत्सवाचे औचित्य साधून गोवर्धन पर्वताची पूजा करून देवाला ५६ भोग लावण्यात आले. मुख्य यजमान अग्रहारकर कुटुंबीयांनी ५६ मिष्टान्नांची भेट चढवली. इतर भक्तांनी स्वखुशीने जवळपास ५०५ विविध प्रकारचे पदार्थ अन्नकूटमध्ये ठेवले.

सर्वप्रथम भागवत पोथी पूजन व ब्राह्मण पूजन झाले. नंतर भागवत कथा सप्ताह यशस्वी करण्यामागे ज्या ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वामी विजयप्रकाशजींनी सांगितले की, येथील भाविक चार-पाच तास भागवत कथा ऐकतात हीच समाधीची पहिली पायरी म्हणावी लागेल. दानाचे नऊ प्रकार सांगताना त्यांनी अन्नदान, समयदान, धनदान, तनदान, विद्यादान आदींची माहिती दिली. भाविकांनी यातील कोणते ना कोणते दान (समयदान) दिले आहेच, असे कौतुकही केले.

लग्न सोहळ्यात पाहुणे मंडळी दंग
श्रीकृष्ण रासलीलेत कृष्ण म्हणून सह्याद्री अहिर व राधा म्हणून कथा अहिर व इतरांनी सहभाग घेतला. मंडपातील भाविक मंडळी रासलीलेत सहभागी झाली होती. शेवटी रुक्मिणी विवाह पार पडला. मंडपात घोड्यावरून वरात आली. दोन्हीकडच्या पाहुणे मंडळींनी बँडच्या तालावर नृत्य केले. यात श्रीकृष्ण म्हणून अमेय अग्रहारकर व रुक्मिणी म्हणून प्रतीक्षा अग्रहारकर यांनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...