आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 हजार भाविक होणार सहभागी:खाराकुवात आज अन्नकूट; 52 पदार्थांपैकी ठोर, दूधपाक, गुंजा अनोखे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वल्लभाचार्यांचा पुष्टीमार्गीय वैष्णव समाजाचा अन्नकूट उत्सव नोव्हेंबर राेजी खाराकुवा येथील द्वारकाधीश मंदिरात होणार आहे. एरवी पाडव्याला होणारा हा उत्सव यंदा ग्रहणामुळे पुढे ढकलण्यात आला होता. कांक्रोळी येथील तिसऱ्या गादीच्या आदेशानुसार हा उत्सव करण्यात येत आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर कानजगाई (कानात आमंत्रण) प्रथा करण्यात आली. यामध्ये गोमातेच्या कानात आरतीप्रसंगी अन्नकुटाला येण्याचे आमंत्रण पुजारी नीलेश जोशी यांनी दिले.

अन्नकूट उत्सवाची तयारी १५ जण ६ दिवसांपासून करत आहेत. यामध्ये अन्नकुटासाठी बनवण्यात येणारे विविध खाद्यपदार्थ सामग्री त्यांनी तयार केल्या. सायंकाळी अन्नकूट उत्सव होईल. यामध्ये मातीच्या भांड्यात सकडी (२१ किलो भात) ठेवण्यात येईल. खाजा, बासुंदी, दूधपाक, मठ्ठा, मोहनथाळ, पेढा, बालुशाही, ठोर, मठडी, गुंजा, तांदूळ गोळी, मूग गोळी असे पदार्थ असतील. गुंजा म्हणजे करंजीचाच मोठा प्रकार आहे. याला विशेष महत्त्व आहे. ठोर म्हणजे पाकातील सुकी पुरी असते.

मंगळवारी सायंकाळी गोपूजन झाले. कारण, आजच्याच दिवशी पहिल्यांदा श्रीकृष्णाने गायी चारण्यासाठी नेल्या होत्या.गायीच्या शिंगावर मोरपंख, पायात फुलांच्या माळा, अंगावर श्रीकृष्णाचे चित्र रंगवले होते.

११४ वर्षे प्राचीन मंदिर, आजही त्याच प्रथांप्रमाणे चालते
द्वारकाधीश मंदिराचे सचिव शिरीष वकील (बंडूभाई) म्हणाले, ११४ वर्षांपूर्वी द्वारकाधीश मंदिर स्थापन झाले. शहरातील एका वैष्णव बांधवाला द्वारकाधीशांचा दृष्टांत झाला, ‘मला हैदराबादेत आता राहायचे नाही, औरंगाबादेत घेऊन चला,’ असा संदेश त्यांनी दिला. त्यानंतर हैदराबादेतून बालकृष्णाची मूर्ती औरंगाबादेत आणण्यात आली. प्रारंभी भाड्याच्या जागेत ठेवण्यात आली. नंतर ही जागा मंदिरासाठी विकत घेतली गेली. व्यंकीदास चौधरी, द्वारकादास कापडिया, रिठालाल यांनी यासाठी पुढकार घेतला होता.

गोवर्धन पूजन आणि अन्नकुटाचा देखणा सोहळा
हा उत्सव बुधवारी शिगेला पोहोचेल. दुपारी २ वाजता गोवर्धन पूजन होईल. या वेळी देवासमोर शेणाचा गोवर्धन करून गोमातेच्या पायाने शेण तुडवले जाईल. त्यानंतर प्रसाद उधळला जाईल. कांक्रोळी नरेश वृजेशकुमार महाराजांच्या आदेशानुसार उत्सव होत आहे, असे डॉ. बीना गढिया यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...