आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्दू साहित्य:‘बज्म-ए तथिर-ए-अदब’चा वर्धापन दिन ; नवखंडा कॉलेज येथे परिसंवाद

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उर्दू साहित्यात कार्य करणाऱ्या औरंगाबादच्या लेखिकांची संस्था “बज्म-ए-तथिर-ए-अदब’ च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन (नवखंडा कॉलेज) येथे परिसंवाद झाला. प्राचार्य डॉ. मकदूम फारुकी अध्यक्षस्थानी होते. या वेळी डॉ. सलीम मोहिउद्दीन, नूर उल हसनैन, डॉ. कीर्तिमलिनी जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी औरंगाबादच्या उर्दू लेखिका वहिदा नसीमवर तजीन फातेमा, मेहेरुन्निसा यांच्यावर डॉ. नाजनीन सुलताना, शफेक फातेमा शेरावर हुमा गजनफर, राणा हैदरी यांच्यावर डॉ. खान रिझवाना, डॉ. मसरत फिरदोस यांच्यावर खान आफरीन, डॉ. शरफुन निहार यांच्यावर नईम अख्तर, डॉ. रिझवाना शमीमवर डॉ. असफिया सिद्दिकी, डॉ. कीर्तिमालिनी जावळेंवर डॉ. सफिया रहमान, डॉ. फातेमा झकेरियांवर शाहबाज झरीन तसेच डॉ. हुसेनी कौसर, डॉ. गझला परवीन व डॉ. फरहत नसरीन यांच्या लेखणीवर डॉ. कनिझ फातेमा यांनी शोधप्रबंध सादर केले. डॉ. शाझिया फरहीन यांनी उर्दू साहित्यात नवीन लेखिकांचा परिचय करून दिला. डॉ. रिझवाना शमीम, डॉ. हुसेनी कौसर,डॉ. गजाला परवीन यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. “बज्म-ए-तथिर-ए-अदब’ च्या संस्थापक अध्यक्षा डॉ. अस्वद गोहर यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...