आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:मनपाचा वर्धापन दिन, 1219 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त ४९२ कर्मचारी- अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याशिवाय १ हजार २१९ कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी आणि ८६ कर्मचाऱ्यांचे ईसीजी काढण्यात आले. एन-११ आरोग्य केंद्र, एन-२ कम्युनिटी सेंटर, सिद्धार्थ उद्यान येथे तपासण्या करण्यात आल्या. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील विविध महापुरुषांना अभिवादन करुन ४० व्या वर्धापनदिनाची सुरुवात केली होती. मुख्य प्रशासकीय इमारतीत महापालिकेच्या पत्रकार कक्षाचे उद्घाटन झाले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेत आयुक्त संघाचा विजय : गरवारे क्रीडा संकुल येथे महापालिका आयुक्त संघाविरुद्ध पत्रकार संघ असा प्रत्येकी १० षटकांचा सामना खेळला गेला. प्रशासक तथा आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी यांनी आयुक्त संघाचे नेतृत्व केले तर मुजीब देवणीकर यांनी पत्रकार संघाचे नेतृत्व केले. पत्रकार संघाने प्रथम फलंदाजी करत सहा गडी गमावून ६० धावा केल्या. आयुक्त संघाने ६.५ षटकात दहा गडी राखून विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...