आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेआधी औरंगाबादेत 'बॅनरवॉर':संभाजीनगर नामकरणाच्या आश्वासनाचा वर्धापन दिन साजरा होतोय का?, भाजपचा सवाल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबादेत शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनरवॉर सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसेनेतर्फे शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र, भाजपनेही याच बॅनरच्या बाजूला आपले बॅनर लावत आजच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेवर टीका केली आहे.

आज संभाजीनगर नामकरणाच्या आश्वासनाचा वर्धापन दिन साजरा होतोय का?, असा सवाल या बॅनर्सच्या माध्यमातून भाजपने शिवसेनेला विचारला आहे. तसेच, संभाजीगनर या प्रश्नाचे उत्तर मागत आहे. त्यावर मुख्यमंत्री काही बोलतील का?, असेही भाजपतर्फे विचारण्यात आले आहे.

शहराला भगवी झालर

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहारातील चौका-चौकात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. शहराचा मुख्य चौक असलेल्या क्रांती चौकाभोवती तसेच येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभवतीदेखील भगवी झालर टाकण्यात आली आहे. हिंदुत्वावरून मनसे, भाजप, राणा दाम्पत्याने शिवसेनेला चांगलेच घेरले होते. त्याला आज मुख्यमंत्री प्रत्युत्तर देणार असून त्यानिमित्त शहरात वातावरण निर्मितीचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.

भाजप आंदोलकांना नोटीस

राज ठाकरे यांचे नव्हे, तर शिवसेनेचे हिंदुत्व खरे आहे, असे सांगण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. मात्र, त्यात पाणीटंचाईचाच मुद्दा लोकांसाठी महत्त्वाचा असेल. त्यावरून भाजपचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी घोषणाबाजी करू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी भाजपच्या 11 जणांना नोटीस दिली आहे. तुम्ही आडदांड असून शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्याच्या स्वभावाचे दिसून येता. म्हणून वर्षभर सार्वजनिक ठिकाणी शांतता राखण्याची हमी द्या, असे नोटीशीत म्हटले आहे.

...तरीही भाजपची तयारी

भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले की, औरंगाबाद शहराच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना विनंती केली. पण ती मिळाली नाही. उलट माझ्यासह आमदार अतुल सावे, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड, भाजयुमोचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे, नितीन चित्ते, गणेश नावंदर, नितीन खरात, बालाजी मुंडे, मनीषा मुंडे, माधुरी अदवंत, भाजप महिला आघाडी शहराध्यक्ष अमृता पालोदकर, गीता कापुरे, रेखा जैस्वाल आदींना नोटीस बजावली. लोकभावनेचे पडसाद उमटू नयेत याची काळजी पोलिस घेत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी लाचारांची असूच शकत नाही. दरम्यान, एका पितळी हंड्याला निवेदन लावून ते वृद्ध महिलेच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...