आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य डाॅजबाॅल संघाची घाेषणा:औरंगाबादच्या 22 खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड; 27-29 डिसेंबरदरम्यान रंगणार स्पर्धा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय डॉजबॉल महासंघ व कर्नाटक राज्य डॉजबॉल संघटनेच्या वतीने राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेचे हसान (कर्नाटक) येथे 27 ते 29 डिसेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा बालगट व वरिष्ठ गट संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी राज्य संघटनेतर्फे महाराष्ट्राचा 60 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. संघात तब्बल 22 औरंगाबादच्या खेळाडूंची निवड झाली आहे.

नुकतेच मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, रामलीला मैदान एन - 7 येथे झालेल्या राज्य संघ निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत खेळाडूंनी राज्य संघात स्थान मिळवले.

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. शेखर शिरसाट यांच्या हस्ते झाले. संघात निवड झालेल्या खेळाडूंचे डॉजबाॅल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विलास नागेश्वर, सचिव प्रा. एकनाथ साळुंके, रेखा साळुंके, वैभव किरगत, कुलदीप सावंत, विजयकुमार मोटघरे, सागर तांबे आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.आर. खैरनार यांनी केले.

राज्य संंघ पुढीप्रमाणे :

वरिष्ठ मुले - साहिल देशमुख, संकेत किरगत, निखिल म्हस्के (औरंगाबाद), गौरव देशमुख, निखिल आगाेणे (जळगाव), तेजस भगत, ऋतिक पोपलकर (अमरावती), सिद्धेश घरत (रायगड), गौरव चव्हाण (जालना), रोहित जगताप (कोल्हापूर), सिराज सय्यद (बीड), प्रतीक सेंबेकर (नागपूर). राखीव - अश्वजीत गायकवाड, आदित्य बोडखे (औरंगाबाद), परेश चौधरी (जळगाव), रविराज आढे (जालना). मुली - गीता वेंळजकर, आरती घायवट, संध्या ससाणे, वैशाली जाधव, साेनल सूर्यवंशी (औरंगाबाद), रूपाली मरस्कोले, रॉयल राठोड, वैशाली ओरलिया(नागपूर), वैष्णवी जाधव (जालना), मुस्कान कांबळे (अमरावती), दिशा खुर्द (रायगड), लता घोगरे (परभणी), अंतरा सिंघम (उपनगर मुंबई), आरती पडोळ, अंजली सातपुते (औरंगाबाद).

बालगट मुले - भावेश पोकळे (अमरावती), रुकेश मुरकुटे, अमाेल सुळे (बीड), सुयश पाटील, अाेम साळुंखे, सावन जाधव (औरंगाबाद), योगेश इंगळे (जालना), अर्णव थोरात, पार्थ महाजन (रायगड), अभिषेक कांबळे, संकेत देशमुख (कोल्हापूर), तनिष जोशी (उपनगर मुंबई). राखीव खेळाडू - पियुष श्रीरामकर (औरंगाबाद), शेख जाहीद (जालना), ओम सुळे (बीड).

मुली - शिवकन्या काळे, गीता माघाडे (परभणी), हर्षदा काेलते, सृष्टी अकोलकर, सिद्धेश्वरी कपटे, रिया तांबूस, स्नेहा पवार, अंजली सातपुते (औरंगाबाद), समृद्धी शिंदे, तपस्या दुबे (रायगड), दुर्बी मलिक, गौरी पवार (उपनगर मुंबई). राखीव खेळाडू - अंतरा सिंगम (उपनगर मुंबई), आरती पडोळ (औरंगाबाद).

बातम्या आणखी आहेत...