आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढती संख्या:औरंगाबादमध्ये आणखी एक रुग्ण आढळला, एकूण रुग्ण संख्या 18 वर, 29 जणांना केले गेले हाेम क्वॉरंटाइन

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मरकजला गेलेली पाच जोडपी लातूरच्या रुग्णालयात दाखल

किराडपुऱ्यातील एका २२ वर्षीय तरुणाला काेराेनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले हाेते. त्याच्या ४९ वर्षीय वडिलांनाही या विषाणूची बाधा झाल्याचे गुरुवारी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे अाता शहरातील काेराेनाबाधित रुग्णांची संख्या १८ वर गेली अाहे. जिल्हा रुग्णालयात गुरुवारी १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २९ जणांना हाेम क्वॉरंटाइन करण्यात अाले, तर ३९ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटीत पाठवले अाहेत. दरम्यान, बुधवारी नमुने पाठवलेल्यांपैकी ४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह अाले अाहेत, तर १९ अहवालांची प्रतीक्षा अाहे. या रुग्णालयात सध्या १५ काेराेनाबाधितांवर उपचार सुरू अाहेत. ४२ रुग्ण देखरेखीखाली आहेत. उपचारानंतर ४३ रुग्णांना सुटी देण्यात आल्याचे डाॅ. प्रदीप कुलकर्णी यांनी साांगितले. सर्व बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर अाहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी गुरुवारी सांगितलेे.  दरम्यान, घाटीत गुरुवारी २२ जणांची स्क्रीनिंग करण्यात आली. यापैकी ८ रुग्णांचे स्वॅब तपासणीस पाठवले अाहेत. अातापर्यंत ८४ रुग्णांचे स्वॅब घाटीतून तपासणीसाठी पाठवले अाहेत, त्यापैकी ७२ निगेटिव्ह अाले, तर ९ जणांचे अहवाल येणे बाकी अाहे.

मरकजला गेलेली पाच जोडपी लातूरच्या रुग्णालयात दाखल

लातूर : लातूर जिल्ह्यातल्या पाच वेगवेगळ्या गावांतील ५ जोडपी दिल्लीत मरकजला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना तातडीने लातूरच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. लातूर जिल्हा प्रशासनाने परदेशांतून आलेले, दिल्लीतल्या मरकजला गेलेले किंवा अशा दोघांच्याही संपर्कात आलेल्यांना स्वत:हून संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात सर्वेक्षण केले जात आहे. याच सर्वेक्षणातून जिल्ह्यातल्या पाच वेगवेगळ्या गावांतील पाच जोडपी मरकजला गेल्याचे स्पष्ट झाले. 

परभणीत ४ नवे संशयित

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात गुरुवारी ४ नवीन संशयित दाखल झाले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत २२४ स्वॅबपैकी १९२ निगेटिव्ह आले असून १६ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. बीड जिल्ह्यातून ६ संशयितांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले असून उद्या शुक्रवारी अहवाल मिळण्याची शक्यता आहे. हे ६ जण तबलिगींच्या संपर्कातील आहेत. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी २३ स्वॅब तपासणीसाठी  घेतले गेले. 

बातम्या आणखी आहेत...