आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम पूर्णत्वाकडे:परभणीतील एमसीएच विंगसाठी आणखी 7 कोटी रुपयांचा प्रस्ताव, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाईंची भूमिका निर्णायक ठरणार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीमध्ये एमसीएच विंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १९ कोटी रुपये खर्च करून इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आहे. उर्वरित कामासाठी आणखी सात कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला. दिवाळीपूर्वी काम पूर्ण होणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी दिली. तर, अाैरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

आरोग्य उपसंचालक लाळे यांच्यासह परभणीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी परभणीतील एमसीएच विंगची मंगळवारी पाहणी केली. यात एमसीएच विंगचे सिव्हिलचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये सिव्हिलच्या कामात लिफ्टचे काम बाकी असून त्यानंतर इलेक्ट्रिफिकेशनचीआणि फर्निचरची कामे बाकी आहेत. लाळे म्हणाले की, अातापर्यंत १९ कोटी रुपये यावर खर्च करण्यात अाले. १०० बेडची ही इमारत आहे. २०१८ मध्येच या एमसीएच विंगला मंजुरी देण्यात आली होती. इतर कामांसाठी आणखी सात कोटींचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या वतीने पाठवण्यात आला. वैद्यकीय शिक्षणमंत्री अाणि अाराेग्यमंत्र्यांच्या वादात अडकलेली एमसीएच विंग अखेर करणार काेण, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे. देसाई यांचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

घाटीबाबत मंत्री देसाईंच्या भूमिकेकडे लक्ष : एमसीएच विंगबाबत औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सुभाष देसाई औरंगाबादला आल्यानंतर त्यांच्याकडे हा विषय घाटी प्रशासनाकडून मांडण्यात येणार आहे. घाटी रुग्णालय हे औरंगाबाद मध्यचे आमदार असलेल्या प्रदीप जैस्वाल यांच्या मतदारसंघात येते. जैस्वाल यांनी एमसीएच विंगबाबत अधिवेशनात प्रश्नही उपस्थित केला होता. पण पुढे काही झाले नाही.

अहवाल मागवला, कारवाई शून्य : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांना घाटीतील एमसीएच विंगबाबतचा अहवाल मागवला होता. त्यानुसार घाटीने तो दिला. मात्र त्यानंतर अजून कुठलीही कार्यवाही झाली नाही. राजेश टोपे यांनी औरंगाबादला आल्यानंतर ही एमसीएच विंग घाटीत न होता आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या महिला रुग्णालयातच करण्याचे घोषित केले.

काय आहे एमसीएच विंग

  • मदर अँड चाइल्ड हेल्थ विंगच्या माध्यमातून महिलांच्या प्रसूतीसाठी स्वंतत्र व्यवस्था केली जाईल.
  • परभणीत शंभर महिलांच्या प्रसूतीसाठी सर्व सुविधा इथे उपलब्ध केल्या जाणार आहेत.
  • लहान बाळांसाठी एनआयसीयूदेखील उपलब्ध असेल.
  • घाटीची एमसीएच विंग २०० खाटांचे आहे. इथे नियोजनानुसार प्रसूतीसाठी सर्व अत्याधुनिक व्यवस्था केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...