आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:शहरात कोरोनामुळे दुसरा बळी, 68 वर्षीय व्यक्तीचा शासकीय रुग्णालयात मृत्यू, रुग्ण संख्या 25 वर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 25 वर पोहचला आहे

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवेस वाढत आहे आणि मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. यातच आता औरंगाबादमध्ये कोरोनामुळे दुसरा मृत्यू झाला आहे. येथील आरेफ कॉलनीतील एका 68 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याआधी एका 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

औरंगाबादमध्ये सध्या 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या 24 पैकी एकजण ठीक होऊन घरी गेली आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी चार जण कोरोना पॉजिटिव्ह आढळले होते. यात 70 वर्षीय व्यक्ती, 30 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगी आणि एका तरुणाचा समावेश होता. आज शहरात एका 17 वर्षीय तरुणालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तो नवीन भागात राहत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 455 वर

आरोग्या विभागाने सांगितल्यानुसार आज 121 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यात मुंबईमधून 92, नवी मुंबई 13, ठाणे 10 आणि वसई-विरार (पालघर जिल्ह्यात) 5 आणि एक रायगडमध्ये रुग्ण सापडला आहे.

सोमवारी राज्यात एका दिवसांत सर्वाधिक 352 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. यातील 70% (242) रुग्ण फक्त एकट्या मुंबईत आहेत. मुंबई एकूण 1540 पॉझिटिव्ह केस समोर आल्या आहेत. याआधी गुरुवारी सर्वाधिक 229 रुग्ण आढळले होते. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2455 वर पोहोचली आहे. धारावीत मंगळवारी सकाळी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर पाच नवीन रुग्ण समोर आले आहेत. यासोबत धारावीतील एकूण कोरोनाग्रस्त संख्या 59 झाली आहे. तर राज्यातील मृतांचा आकडा 163 वर गेला आहे.

बीड : दोन कोरोना निगेटिव्ह रुग्णांचा मृत्यू

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या  ७ जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आला नाही. तथापि, या जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या स्वॅबचे   अहवाल येणे बाकी असल्याने भीती कायम आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात कोरोना निगेटिव्ह आलेल्या दोघांचा मृत्यू झाला.

जालना जिल्ह्यात आणखी २२ संशयित रुग्ण दाखल झाले असून १०२ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या केवळ एकच रुग्ण पॉझिटिव्ह आहे. नांदेड जिल्ह्यात आजवर एकही रुग्ण आढळला नाही. केवळ ३९ संशयित निरीक्षणाखाली रुग्णालयात दाखल आहेत. मंगळवारी १५ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून मंगळवारी केवळ एक संशयित दाखल झाला आहे. तथापि यापूर्वी तपासणीसाठी पाठवलेल्या ६ संशयितांचा अहवाल येणे बाकी आहे परभणी जिल्ह्यातही नवीन रुग्ण नाही. मंगळवारी १५२ लोकांना क्वॉरंटाइन केले गेले. मंगळवारी  नव्याने २९ संशयित दाखल झाले. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. लातुरातही नवीन रुग्ण सापडला नाही. बीड जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नसला तरी कोरोना निगेटिव्ह असलेल्या दोघांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...