आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राचा निर्णय:‘अॅप्रेंटिसशिप प्रमोशन’ला अजून एक वर्षाची मुदतवाढ ; कंपन्यांमध्ये 9,570 जणांना प्रशिक्षण

औरंगाबाद / गिरीश काळेकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज भासते. यासाठी तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून नॅशनल अॅप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (एनएपीएस) योजना राबवण्यात येत होती. २०२१ पर्यंतच खरे तर या योजनेची मुदत होती, पण भविष्यातही कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने या योजनेला आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

सध्या या योजनेत ९ हजार ५७० जण शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवाराला १५०० रुपये मानधन आणि संस्थेच्या माध्यमातून ७५०० रुपयांपेक्षा अधिक मानधन दिले जाते. आयटीआयमधून उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्यांदा अॅप्रेंटिसशिप करावी लागते. विविध कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून काम मिळवण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात. अशा उमेदवारांना औद्योगिक आस्थापनामध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचा विनियोग करून कुशल कारागिराला आवश्यक असलेले प्रशिक्षण केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन (एनएपीएस) योजनेतून दिले जाते. २०१६ ते २०२१ या पाच वर्षांसाठीच ही योजना अस्तित्वात आली होती. मात्र केंद्र शासनाने नुकतीच याला एक वर्षाची मुदतवाढ दिली. यामुळे भविष्यातही शिकाऊ उमेदवार म्हणून विविध कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळू शकेल.

आजमितीला ९,७५० जण करताहेत काम
सध्या २५० कंपन्यांकडून या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी घेतले जात आहेत. त्यापैकी १८१ कंपन्यांनी आतापर्यंत ९ हजार ७५० जणांना प्रत्यक्ष नोकरीही दिली आहे. यात आयटीआय उत्तीर्ण ३,२०० उमेदवार असून इतर ऑप्शनल प्रकारातील उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित कंपन्यांकडूनही मागणी होतेय.

अशी करू शकता अॅप्रेंटिसशिपसाठी नोंद
राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत विविध कंपन्यांमध्ये आयटीआयचे ट्रेड आणि इतर अभ्यासक्रमांतर्गत रोजगाराची संधी मिळण्यासाठी विद्यार्थी www.apprenticeshipinida.org या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात, अशी माहिती शासकीय अायटीआयचे प्राचार्य अभिजित आल्टे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...