आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवद‌्गीतेचे वाचन:गीतेमध्ये जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर : राजेश्वरी जोशी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवद‌्गीता ग्रंथ प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून सांगण्यात आला आहे. जीवनातील प्रश्नांची उत्तरे यात मिळतात. त्यासाठी भाविकाने भगवद‌्गीतेचे वाचन करायला हवे, असे मत राजेश्वरी जोशी यांनी व्यक्त केले.गीता परिवारातर्फे गीता जयंती उत्सवनिमित्त जयविश्वभारती परिसरातील विश्वेश्वर महादेव मंदिरात भागवताचार्य राजेश्वरी जोशी यांचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी गीता परिवाराच्या अध्यक्षा माधुरी सोमाणी, सचिव कनकमल यांनी राजेश्वरी यांचा सत्कार केला. यानंतर जोशी यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या १२ व्या आणि १५ व्या अध्यायाचे सामूहिक पठण केले. वाचन झाल्यावर राजेश्वरीताईंनी गीतेचा १८ वा अध्याय सांगितला. त्या म्हणाल्या की, गीतेचे आचरण प्रत्येक घरात व्हायला हवे. गीतेत आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. गीतेत प्रत्येक समस्येचे समाधान आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपना शारदा, नीता तोतला यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...