आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:साकारतर्फे 125 शाळांत बालविवाहविरोधी जागृती ; समाजसेवकांनी घेतल्या 354 कार्यशाळा

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साकार संस्थेच्या वतीने दत्तक जाणीव जागृती सप्ताहांतर्गत व्याख्यान, कार्यशाळा, सहली आणि भेटी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचा समारोप सोमवारी संस्थेच्या प्रांगणात झाला. संस्थेच्या बालविवाहविरोधी जनजागृती कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. साकार आणि युनिसेफ यांच्या सहकार्यातून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पात ३ महिन्यांत प्रशिक्षणार्थी समाजसेवकांनी ३५४ कार्यशाळा घेतल्या. १२५ जिल्हा परिषद शाळांतील २० हजार विद्यार्थी आणि ३ हजार पालकांशी संवाद साधला. ९९४४ मुली, तर १०,४९७ मुलांचा समावेश होता. १७०९ महिला, तर १३०३ पुरुष पालकांचाही समावेश होता. बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक होणारे नुकसान याकडे लक्ष वेधण्यात आले.

सर्वांच्या सहकार्याचे ऋण फेडण्याची संधी
जाणीव जागृती सप्ताहात विविध पातळ्यांवर आम्ही दत्तक विधानाबद्दल जनजागृती केली. यामध्ये मदत केलेल्या सर्वांच्या सहकार्याचे ऋण फेडण्यासाठी सत्काराचा कार्यक्रम घेतला.
-अॅड. अर्चना गोंधळेकर

आमच्यासाठी महत्त्वाचा अनुभव
बालविवाहाचा निर्णय घेताना समाजाच्या अंतरंगात काय घडते, त्यावर तोडगा काय असू शकतो, यावर उपक्रमातून आम्ही चर्चा झाली. चांगला अनुभव ठरला.
-अशोक शेरकर

जनजागृती मोठा बदल घडवेल
या उपक्रमात आम्ही विविध खेळ, संवाद यातून मुला-मुलींना बालविवाह विरोधाचे महत्त्व समजावून सांगितले. योग्य संवादातून हा प्रश्न सोडवता येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. -वैशाली पाईकराव

बातम्या आणखी आहेत...