आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटीबॉडी:शहरा पेक्षा ग्रामीण भागात अँटीबॉडी सापडण्याचे प्रमाण नगण्य येण्याचा आनुमान

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • अँटीबॉडी चाचण्या शेवटच्या टप्प्यात जि.प. आरोग्य विभाग

शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागात अँटीबॉडी चाचण्याची मोहिम ही अंतिम टप्प्यात असुन निवडक १८ गावातील नागरिकांचे नमुणे घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या पाहता अँटीबॉडी सापडण्याचे प्रमाण हे अंत्यत नगण्य येणार असल्याचा आनुमान जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलतांना केला .

गेल्या काही दिवसापासून कोरोना विषाणूने औरंगाबाद ग्रामीण भागात आपले पाय पसरायला सुरूवात केली आहे. शहराच्या तुलने इतकी ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्ण आढळत आहे. जिल्ह्यातील १३३८ गावापैकी आजच्या घडीला ३९३ गावे हे कटेमेंट झोनमध्ये आली आहेत. या गावांत कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंनदिवस वाढत आहेत. आजच्या घडीला जिल्ह्यात ७ हजार ७६८ रुग्ण असून त्यातील ६ हजार २१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर मूत्यू दर हा १.१ आहे. दरम्यान जिल्ह्यातील विविध गावांतील ६९७ नागरिक व सर्व तालुक्यातूून ६७७ नागरिकांच्या ऑटीबॉडीचे नमुणे घेण्यात आले आहे. दरम्यान लॉकडॉउनच्या काळात शहरात १५ हजाराहुन अधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या होती. अशा परिस्थितीत शहरातील ऑटीबॉडी सापडण्याचे प्रामाण हे १२ टक्के आहे. याच्या तुलनेने ग्रामीण भागात रुग्ण संख्याही अंत्यत कमी असल्याने अँटीबॉडी सापडण्याचे प्रमाण कमी येणार आहे. तसेच ग्रामीण भागात नागरिक कोरोना बाबत सर्तक झाले असून आरोग्य विभाग, आगणवाडी सेवीका, अशा वर्वâर यांच्या मार्पâत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे डॉ. गंडाळ म्हणाले.

जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ साथ रोगही डोकेवर काढत आहे. दरम्यान पैठण तालुकयातील गावात डेंगू चा एक रुग्ण आणि मनपा हद्दीत एक रुग्ण आढळून आला आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी डेंगू, मलेरिया, गॅस्ट्रो अशा साथ रोगाचे रुग्ण नसल्याचे डॉ.गंडाळ यांनी सांगितले. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते आजपर्यंत जिल्ह्यात १ हजार ७९० पैकी १ हजार ६०० महिलांची प्रसूती झाली आहे. तर १५ हजार ग्रर्भवती महिलांची नोंदणी करण्यात आली असल्याचेही डॉ.गंडाळ यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser