आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेहाची अवहेलना:बीड जिल्हा रुग्णालयातील मृतदेहाला लागल्या मुंग्या

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वीदेखील असे प्रकार अनेकदा घडले आहेत

कोरोनाबाधित महिलेच्या मृतदेहाची अवहेलना केल्याचे प्रकरण शांत होत नाही तोच आता नवा प्रकार जिल्हा रुग्णालयात समोर आला आहे. शवगृहातील मृतदेहाला मुंग्या लागल्याचे शनिवारी उघड झाले आहे.

पाडळसिंगी येथील ५० वर्षीय अनोळखी व्यक्ती १९ मे रोजी जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला. परंतु, येथे मृतदेहाला चक्क मुंग्या लागल्याचे उघड झाले. यापूर्वीदेखील असे प्रकार अनेकदा घडल्यानंतरही यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

दरम्यान, कोरिनाबधित महिलेच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याचेचे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर आता अनोळखी मृतदेहाबाबत हा प्रकार घडला आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ न शकल्याने रुग्णालय प्रशासनाची बाजू कळू शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...