आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच रिलीज:अनुष्का आणि नवीनचा ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलीशेट्टी’चे पोस्टर आऊट

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य स्टार अनुष्का शेट्टी लवकरच ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नवीन पॉलिशेट्टीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज केले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी तुम्हा सर्वांसाठी सादर करत आहे. या उन्हाळ्यात मनोरंजनाच्या रोलर कोस्टर राईडसाठी सज्ज व्हा.’

सूत्रानुसार, ही कथा ४० वर्षीय महिलेच्या आवती-भोवती फिरते.. तिला २० वर्षीय तरुणाशी प्रेम होते. या चित्रपटाची निर्मिती महेश बाबू पी करत आहेत, युव्ही क्रिएशन बॅनरखाली त्याची निर्मिती करण्यात आली. हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. सध्या तरी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...